या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. | आमच्या जातिभेदाने मानापमानाचे प्रस्थ फार माजून राहिले आहे. त्यामुळे व्यवहारांत हरहमेशा मोठमोठाल्या अडचणी येतात, हे तर येथे सांगावयास नकोच. हल्ली आमच्या इकडे साधारणपणे काही लोकांचा असा एक कल झालेला दिसतो की, उच्च प्रतीचे शिक्षण प्राप्त करून घेतल्याखेरीज, पोट चालावयाचे नाही, हणजे इंग्रजी विद्या शिकल्याखेरीज, ' हायस्कुले ' व 'कॉलेजें' ह्यांच्या द्वारापर्यंत रोज पायपिटी केल्याखेरीज कोठे नोकरी मिळणार नाही, व पोटही भरणार नाही. एकदां पाश्चात्य विद्याज्ञानाने मंडित होऊन, दोन अ. क्षरी सुके किताब घेऊन, एकदां कोठेतरी नोकरी मिळून, पोटाची ददात चुकली, की ' कृतकृत्यश्च भारत ' झाले ह्मणून समजावें. ह्याशिवाय-शिकल्याशिवाय किंवा नोकरी लागल्याशिवाय दुसरा पोट भरण्याचा मार्गच कोणास दिसत नाहीसा झालेला आहे. ह्यांत द्विजवर्ण तर शिक्षणाचा पिच्छा पुरवीत आहे तो आहेच. शिवाय, शेतकरी, माळी, सुतार, वगैरे अन्य जातींनीही तो भाग आटोपण्याचे मनावर घेतले आहे, आणि त्या लोकांना देखील हल्ली दुसरा धंदा दिसेनासा झाला आहे, असे दिसते. अशा तमाम झुंडी गोळा होऊन, नोकऱ्यांवर उड्याच्या उड्या पडूं लागल्यामुळे नोकरी कोणास द्यावी व कोणास मिळावी, ही पंचाईत उभी राहूं लागली आहे. बहुतेक सगळ्या जागा जिकडे तिकडे भरून गेलेल्या असतात. मग आपलें उगीच टपत बसावें, की कोणाची जागा खाली होईल, व मी तेथे जाऊन चिकटेन-हणजे जागा खाली व्हावयाला नको, व ह्यांस नोकरी मिळावयास नको. मग बसले स्वस्थ माशा वारीत. असे युनिव्हर्सिटीतील टांकसाळी नाण्यांचा टिळा लावून फिरणारे कांहीं होतकरू रिकामे हात हालवीत पडलेले, कोठे कोठे दृष्टीस पडतात. इंग्रजी भाषा व तींतील ग्रंथ ही केवळ भरगच्ची व बिनमोल ज्ञानभांडारें होत. ह्मणून त्या भाषेचे ज्ञान करून घेणे, व शिकणे हेही आवश्यक आहे. पण सुशिक्षित झाले की, लागलीच पोट भरण्यासाठी नोकरीच धरली पाहिजे, असें का एखाद्या शास्त्रांत सांगून ठेवले आहे ? उलट हल्लींची सर्व शास्त्रे धुंडाळली तर असे दिसून येईल की, नानात-हेचे धंदे करावेत. इंग्रज लोकांचा इतिहास धुंडाळला तर असेंच दिसून येईल की व्यापारधंदा करावा. इंग्रजलोकचसे काय पण बहुतेक पाश्चिमात्य राष्ट्रांतील लोक व्यापारानेच उदयाला व भरभराटीला पोचले आहेत. हे आमच्या आलीकडच्या बहुतेक अल्पवयस्क सुशिक्षित मंडळीला माहीत नसेल काय ? त्यांनी शास्त्रे व इतिहास वाचले नसतील काय ? आमच्या प्राचीन शा