या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ७ वा. जुलै १८९८. नामांकित आहे. तेथील माजी बादशहा फ्रेडरिक ह्यांजविषयी मागे सांगितलेच आहे. त्यांचे पुत्र देखील सुतारकाम चांगले करतात. आमचें ब्रिटिश राजकुलही अशाच प्रकारचे आहे, हेही मागे सांगितलेच आहे. बव्हेरियाचे ड्यूक म्याग्झिमिलियन ह्यांचे दोघे पुत्र-हणजे आस्ट्रियांच्या बादशाहिणीचे बंधु-आजकाल निढळींच्या घामाने स्वतः उद्योगधंदा करून, जो पैसा येतो, त्यावर आपला 'उदरंभरणा'चा व्यवसाय चालवीत आहेत. त्यांपैकी थोरले राजपुत्र (बादशाहिणीचा थोरला भाऊ) एक प्रकारच्या हाटेल (खाणावळी) वर मुख्य आहेत. प्रिन्स ऑफ वेल्स युवराज, यांचे पुत्र प्रिन्स जॉर्ज फ्रेडरिक ड्यूक ऑफ् यार्क हे नौकानयनविद्येत मोठे तरबेत आहेत. स्वीडनचे ऑस्कर हे लांकूडतोड्याच्या कामांत कुशल आहेत. खुद्द ख्रिस्त्यांचा प्रभु येशू ख्रिस्त हा सुतार होता, ह्मणून ज्यू (यहुदी) लोकांत त्याची प्रसिद्धी असे. लिव्हिगस्टोनप्रख्यात प्रवासी-हा शिंप्याचा धंदा करीत असे. विलियम् क्यारे हा जोड्यांस ठिगळे देत असे, असें तो स्वतःच ह्मणतो. मिचेल फरडे हा सर हंफ्रे डेव्हि यांच्या येथे बाटल्या धुवावयाचे काम करीत असे. एलिहू बरिट हा लोहारकाम करी. आणि प्रख्यात आब्राहाम लिंकन लोखंडी गज तोडण्याचा धंदा करीत असे. असो. ह्यावरून पाहतां काय बरें निष्पन्न होतें ? कोणताही धंदा असो, व तो कोणीही करो, तो करणारा निरंतर कीर्तीस व सुखास पात्र होतो. मात्र मान आणि अपमान हे शत्रू टाळावेत. . परंतु आमच्या इकडे जिथे नोकरीमध्येच " आझांस उत्तम त-हेची नोकरी हवी, फार कष्ट न पडावेत, ती दगदगीची नोकरी कोण धरतो" ह्मणून निवडक मान हवा लागतो, व काबाडकष्ट-नव्हे नव्हे अल्पही कष्ट करावयास नकोत, तेथे इतर धंदे कसे व्हावेत. कारण धंद्यांत एकसारखें खपावें लागते, पुष्कळ कष्ट करावे लागतात, तेव्हांच पैसे मिळणार, “घनांबु न पडे मुखीं, उ. घडिल्याविना पाखरें" हे तत्व ते बिचारे विसरून जातात, मग ते उद्यमसुरतरूला मनापासून पाणी ते काय पाजणार ? बरे इतकेंही करून एखादा तयार झालाच तर धंद्याची निवड करावी लागते, आणि ती करावयास लागले हणजे पराक्रमाचा भोपळा फुटतो. " शिंप्याचा शिवणकामाचा धंदा ना, तो काय आह्मीं करावयाचा." आह्मी ब्राह्मण किंवा इतर उच्च प्रतीच्या जातीचे असेंच जो तो ह्मणणार. ह्मणजे येथे जातीचा मानापमान आडवा आला. तो छाटून टाकला ह्मणजे सहजी सुरेख काम होईल. एखाद्या उच्च जातीच्या मनुष्यान