या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. गिलेडा दिसण्यांत उग्र, भयंकर असून शरीरानेही खूप मजबूत असतो. उभा राहिला ह्मणचे त्याची उंची तीन फुटींत काही कमी नसते. ह्याच्यामध्ये इतर वानरांहून व माकडांहून विशेष गोष्ट असते. ती ही की, त्याच्या गळ्यांभोंवतीं सिंहाप्रमाणे लांबलचक आयाळ अ. सते. ह्याचे दंत इतके तीक्ष्ण असतात की, चित्त्याचीही त्यांच्यापुढे मातब्बरी नाही. शियाय दंतपंक्तीची ठेवण अशी काही विचित्र असते की, तिच्या योगाने पाहिजे त्या प्राण्याला सहज फाडतां येते. सुळेदाताच्या अणकुच्या केवळ सुईसारख्या असून त्यांच्या आंतील खडा अशा तीक्ष्ण असतात, की जणों काय सुरीचे पातें! त्याने कापावयाचे काम पोलादी हत्याराहूनही सफाइदार होते. परमश्वराने दिलेल्या ह्या स्वयंभु हत्यारांचा प्रभाव त्याला पक्का माहित असल्यामुळ, तो चवताळला ह्मणजे शत्रूच्या अंगावर बेलाशक तुटून पडतो. आणि हातापायांनी त्यास गच्च मिठी मारून त्याच्या मानगुटीत तक खोल दांत खुपसतो की. दांतांच्या दोन्ही पंक्ती एकास एक मिळतील. नंतर जोराने एक हिसडा मारतो, ह्मणजे त्याच्या मांसाचा लपकाच्या लपका बाहेर पडतो. त्याची जखम एवढी मोठी होते की, त्या प्राण्याला मरावयास बहधा एक क्षणही लागत नाही. मध्ये नवखा अडाणी कुत्रा असला, की गिलेडाने त्याची चादा आटवलीच ह्मणून समजावें. तो त्याच्या तावडीतून सुटावयाचा नाहाच. परंतु जे जुने-वहिवाटलेले असतात, ते मात्र ह्याला पाळखून असतात. ह्याचा कावा त्यांना माहित असतो, आणि त्यांचा कावा ह्याला माहित असतो. शिकारी लोक, शिकारी कुत्रे ह्या दोघांच्याही हातांवर तुरी देण्याच्या कामांत गिलेडाइतका वस्ताद प्राणी दुसरा क्वचित् आढळेल. वर्ष सहा महिने बंदुका भरून व कुत्रे सजवून प्रत्यही जरी शिकारीस गेले, तरी एक गिलेडा हाती पडेल किवा नाही ह्याचा वानवाच आहे. शिकारी लोकांची चाहूल त्यास तेव्हांच कळते. आणि तो मग त्यांच्या थायमोऱ्यास सुद्धा उभा रहात नाही. त्याची उडी अतिशय पल्लेदार असते. तिच्या सहाय्याने तो हां हां ह्मणतां गोळीच्या टप्यांतून पार होतो. तसेंही करण्यास संधि न मिळेल, आसोपास घनदाट वृक्ष नसतील, एकाच वृक्षावर सांपडण्याची