या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. लांचा अगदीं फडशा पाडला. पण त्यांत एक चमत्कार हा की, त्या बागांत कितीएक देवस्थानांच्या व कांहीं वकिलांच्या बागा होत्या त्यांत मात्र हे प्राणी मुळींच शिरले नाहीत. ह्यांची सारी धाड काय ती ग्रामस्थांच्या बागांवर. तेव्हां गांवच्या लोकांनी कट करून सुरवंटांनी केलेले नुकसान भरून द्यावें ह्मणून गांवच्या पंचांपुढे सुरवंटांवरच फिर्याद लावली. परंतु तींत कांहीं निष्पन्न झाले नाही. ह्मणून त्यांनी 'मारियन'च्या जज्जकोटीत अस्सल दावा आणला. गांवचे मळेकरी हे वादी; आणि प्रतिवादी कोण ? तर लक्षावधि सुरवंट ! अशी विलक्षण फिर्याद कोटीत दाखल होतांच, ज्यांच्या उत्पन्नास त्या प्राण्यांनी धका लावला नव्हता, असे दोन वकीलही प्रतिवादींच्या तर्फेनें हजर झाले. हे वकील मोठे कायदेपंडित असून उत्तम वक्ते होते. ही फिर्याद दाखल होतांच जज्जानें एक नोटीस लिहिली, आणि वकिलांच्या मार्फत प्रतिवादींस कळविले की, तुह्मी आपआपसांत तोड जोड कराल तर बरे होईल. परंतु दुसरे दिवशी प्रतिवादींच्या वकिलांनी येऊन कळविले की, आमचे कूळ आपसांत तोडण्यास खुषी नाहीं ! तेव्हां वादीचे खरोखर नुकसान किती झाले, ह्याचा अंदाज करण्याकरितां कोर्टानें एक कमिशन नेमून त्यास पाहणी करून नक्की किती नुकसान झाले ह्याचा रिपोर्ट करण्याविषयी फर्मावले. त्याप्रमाणे रिपोर्टही येऊन दाखल झाला; तेव्हां तो रिपोर्ट बरोबर आहे किंवा नाही, ह्याबद्दल वादीप्रतिवादींच्या वकिलांत बोलाचाली सुरू झाली. तेव्हां जज्जानें आपले मत असें दिले की, सुरवंटांच्या विरुद्ध डिक्री करण्यामध्ये इतकी घाई करण्यांत कांहीं अर्थ नाही. कारण, प्रतिवादींच्या कांहीतरी पातकास शासन व्हावें झणूनच परमेश्वराने त्यांस पाठविले असावे. परंतु ते कोणाच्या मनास जाले नाही. तें भिजत घोंगडे तसेंच पडले. शेवटी ह्या इ. स. १५४९ ये सुरू झालेल्या खटल्याचा इ. स. १५४६ च्या मे माहन्यामध्य एकदाचा निकाल झाला. जज्जाचा ठराव येणेप्रमाणे होता “ दावा लावण्यासारखी ही फिर्याद दिसत नाही. सुरवंटांना इतके दिवस विनाकाTण कोटीत रखडावे लागले. ह्याकरितां प्रतिवादीचा झालेला सारा खर्च वादींनी द्यावा, व पुन्हां अशा भानगडीत पडूं नये." ह्या ठरावा