या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. पाळी आली, तरी सुद्धा तो कुत्र्याच्या तावडीत की बंदुकीच्या मारांत सांपडत नाही. तो चटकर सर्वांचीही नजर चुकवून एकाद्या डहाळीच्या किंवा पानांच्या आड असा मुरून बसतो की, कोणास मागमूस न लागे. अशा स्थितीत बराच वेळ लोटल्यावर ज्या बाजूस कुत्र्यांची व मनुष्यांची नजर नाही, अशा बाजूकडून हलकेच उतरून एक पान न वाजवितां, की गवताची एक काडी न हालवितां, भुईसरपटत लोळण घेत, गोळीच्या टप्यांतून पार होतो, आणि दुसरें झाड गांठून निघून जातो. लपत छपत जाण्याचे कौशल्य, गिलेडाप्रमाणे इतर प्राण्यांस साधावयाचे नाही. हिकडे कुत्रे आणि शिकारबहाद्दर त्याच झाडावर गिलेडा आहे ह्मणून कोकलत कोकलत, आणि अखेर हिरमुसल्या तोंडाने निघून जातात. ही स्वारी घुलाटणी देऊन केव्हांच निघून गेलेली असते, त्यांची त्यांना दादही असत नाही! चोरी करण्याच्या कामांत ह्यांचा अगदी हातखंडा आहे. आणि त्या कामी ते जी युक्ति योजतात ती विलक्षण असते. एखाद्याच्या घरांत पुष्कळ फळें असली, आणि त्यांच्यावर डल्ला मारावयाचे ह्यांच्या मनांत आले; तर ह्यांस पक्के माहित असते की, आमचा सारा कळपच्या कळप तेथे गेल्यास, मनुष्यांची बंदूक आपणांस चुकवितां येणार नाही, आणि कुत्र्यास आपली चाहूल लागल्याशिवाय रहाणार नाही. ह्मणून अशा वेळी कळपांतील एका मोरक्यास ते पुढे करतात. तो हळूच दबत दबत कुंपणावर चढतो आणि ती फळे हातास येतील अशा ठिकाणी, पण कोणास न दिसेल, कोणास यत्किचित्ही चाहूल न लागेल अशा बेतानें, बसतो. दुसरा कुंपणाच्या बाहेरच्या बाजूस मुळाशी असा बसतो की, त्यास पहिला वानर दिसावा, पण इतर कोणास तो मात्र दिसूं नये. नंतर तिसरा, चौथा ह्याप्रमाणे माळकाच्या माळका बसते. आणि शेवटचा वानर अगदी नित्रास झाडीत किंवा सुरक्षित ठिकाणी बसलेला असतो. ह्याप्रमाणे सर्व तयारी झाली झणजे पहिला वानर हळूच झाडाचे एक फळ, सवड होईल त्याप्रमाणे तोडून किंवा दांतानें डेंख चावून हातांत घेतो, आणि हलकेच दुसऱ्याकडे फेंकतो. दुसराही तशाच वेताने हळूच तिसऱ्याकडे फेंकतो. तिसरा चवथ्याकडे, चवथा पांचव्याकडे, पांचवा सहाव्याकडे, ह्याप्रमाणे-आगीच्या बंबाला लोक जशी पा