या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. १७३ बसे; पण इतके झाले तरी तिला इजा ह्मणून त्याने कसली ती केली नाही. तिला प्रथम प्रथम त्याचे भय वाटे, परंतु मग तिलाही त्याची चेष्टा आवडू लागली. या एक वेळ काही मंडळीने ह्या गिलेडास रानांत सोडून एक कुत्रा मागे लावला. आणि काय मजा होते ती पहाण्यासाठी ती अगदी आतुर होऊन बसली. गिलेडाने प्रथमतः कुत्र्यास दहापांच हुलकावण्या देऊन पाहिल्या. परंतु त्यांतून आपला निभाव लागेल असें दिसेना. तेव्हां त्याने एका झाडाचा आसरा पाहिला, आणि पटकन् उडी मारून त्याच्या वरील दुबेळक्यांत ही स्वारी जाऊन बसली, आणि शेपटीचा गोंडा खाली सोडून दिला. पण तो इतक्या बेताने सोडला की, कुत्र्याने अगदी जीवापलीकडे उडी मारली, तर त्याचे तोंड त्यास जेमतेम पुरेल न पुरेल. कुत्राही धांवत धांवत झाडाखाली जाऊन उभा राहिला. व त्याच्या शेपटाकडे पाहून त्याच्या मनांत आशाही उत्पन्न झाली की, आपण एक खच्चून उडी मारावी, आणि शेपूट धरून आपल्या शत्रूस खाली ओढावें. ह्या उमेदीने जीव ताणून ताणून तो उड्या मारूं लागला. त्याने उडी मारली, झणजे गिलेडाने अमळसा आपला गोंडा वर उचलावा; कुत्र्याचे पाय जमिनीस टेंकले की, पुन्हा पूर्ववत् सोडावा. आतां शेपूट सांपडते, मग सांपडते, ह्मणून कुत्रा जीव तोडीतच होता. हे राजेश्री एका ढापीवर पाय ताणून एका ढापीवर पाठ टेंकून खुशाल पडले होते. तो घटकेंत आकाशाकहे पाही; घटकेंत सभोंवार नजर टाकी; घटकेंत खाली कुत्र्याकडे पाही. जणों काय, आकाशाची शोभा कशी आहे ? सृष्टिसौंदर्य किती विचित्र आहे ? कुत्रा हा किती विचित्र, आणि खुळसट प्राणी आहे ? ह्याचाच विचार करीत आहे! कुत्र्याने हवी तितकी पराकाष्ठा केली; जहांग जहांग तोडले; पण काही नाही. 'कुक् ' करून एकदां वर उडी मारी? पुन्हा खाली पडे. पुन्हा गुरगुरे, पुन्हा भोंके. ह्याप्रमाणे तास, दीड तास सारखा त्याचा क्रम सुरू होता. कुत्र्याची आशा, आणि गिलेडाची खात्री, ह्यांपैकी कोणीच हार जाण्यासारखे नव्हते. अखेरीस उड्या मारून मारून कुत्रा थकला; त्याच्या तोंडास फेंस आला. उडी मारण्याची तर काय, पण पाऊल टाकण्याची सुद्धां शक्ति राहिली नाही. तेव्हां का हौस पूर्ण झाली