या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. की नाही?' असेंच जणों काय विचारित आहे, अशा मुद्रेनें मंडळीकडे एक वेळ पाहून गिलेडाने एकदम झाडावरून उडी टाकली. आणि दिग्विजय केलेला राजा सिंहासनावर बसल्याप्रमाणे, पांचचार उड्डाणांत मंडळी गाठून तो मोठ्या उल्हासवृत्तीने आपल्या धन्याच्या स्कंधावर विराजमान झाला !! गिलेडा हा नुसत्या करमणुकीच्याच उपयोगी आहे असें नाही, तर दुसन्याही पुष्कळ कामास त्याचा उपयोग होतो. शिकारी लोकांस त्याचा फार मोठा उपयोग होतो. तो त्यांस शिकार धरण्यातच नव करता अस नाही. तर तशा प्रसंगी अन्नपाण्याचाही मोठा पुरवठा करता. खाण्याचे भक्ष्य, आणि पिण्याचे पाणी आसपास कोठे आहे, त्याचा सगावा काढण्यांत गिलेडा हा अगदी निष्णात आहे. पण मुळे, रताळी, बटाटे, भुईमुगाच्या शेंगा अशासारखी कंदमुळे तो शोधून काढून आपण खातो येवढेच नव्हे, तर धन्यासही त्याचा जवाना करून सोडतो! उन्हाच्या तापांत सोयीवार भांडे दिले तर ते । पाण्यापर्यंत जाऊन भरून तोंडांत धरून घेऊन येतो. ह्यावरून हा आणा कवढा बुद्धिवान्, किती स्वामिभक्त, व कसा उपयोगी आह, ह्याची कल्पना सहज होण्यासारखी आहे. पण ह्या साहूनही, त्याच्या अंगी दुसरी एक अप्रतिम शक्ति आहे. ता काणती? तर त्याच्या डोळ्यांची. गिलेडाचे डोळे इतके तीव्र आहत की, जणों काय दुर्बीण! ह्याचा अनेक शोधक लोकांनी अनुभव घेतला आहे. ह्यासाठी त्यांनी एक चमत्कारिक प्रयोग करून पाहिला. गिलडाला एका उघड्या जाग्यावर बांधून ठेवले आणि त्याचा धनी व दुसरा काही मंडळी सुमारे पांच मैल अंतरावरच्या डोंगरावर जाऊन तो प्राणी दिसेल अशी दर्बीण लावली. आणि आपण येथे केलेल्या | कृतात तथ त्या प्राण्याच्या मुद्रेत काय काय फेरफार होतो हे पाहूं लागले. तेव्हा असा चमत्कार दृष्टीस पडला. धनी पुढे आला ह्मणजे तो आनंदाने नाचूं लागे; तो लपुन बसला, झणजे तो कावराबावरा होई; त्याने फळे दाखविली झणजे तो जिभळ्या चाखू लागे; आणि त्याजवर बंदूक रोखली ह्मणजे भयाने घाबरून दबून बसे!! हा प्रयोग संपल्यानंतर मंडळी जेव्हां परत त्याच्या जवळ गेली, तेव्हां तो गिलेडा आ