या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. १७६ पण दुरून पाहिलेली फळे घेण्यासाठी आपल्या धन्याचे खिसेच खिसे चांचपूं लागला, व ती दिल्यावर मोठ्या आनंदानें तो खात बसला ! ह्याच्या अंगी आणखी एक चमत्कारिक गुण आहे. तो इतर कोणत्याही वानरांत आढळला नाही. तो गुण हा की, तो जेव्हां निजतो, किंवा विश्रांति घेतो, तेव्हां त्याच्या त्या बसण्याची ढब अशी कांहीं विलक्षण दिसते की, जणों काय एखादा जटिल ऋषीच मुद्रा घालून योगाभ्यासाला बसला आहे. किंवा एखादा विरक्त महामुनी समाधिसुखांत निमग्न झाला आहे. ह्या मुद्रेस त्याच्या मस्तकाभोंवतालची आयाळ तर विशेषच भूषणभूत होते. हेच ध्यान प्रथमारंभींच्या चित्रांत दाखविले आहे. ते पाहून स्वामिनामोच्चारांत तंद्री लावलेल्या श्रीहनुमंताचे स्मरण झाल्यावांचून कोणास राहील ? इतकेंच नव्हे, तर ह्याच पद्धतीने त्या रघुवीरसेवकाची प्रतिमा तयार केली, तर ती अतिशय रम्य व यथार्थ होईल ह्यांत तिळमात्र संदेह नाहीं. प्रसिद्ध चित्रकार भिवा सुतार ह्यानें औंधास में अद्वितीय मनमोहक श्रीरामपंचायतन काढले आहे, त्यांतील मारुति केवळ अशाच स्वरूपाचा आहे. ह्मणून सर्व लोक त्याजवर तल्लीन होतात आणि तारीफ करतात. मार्कोपोलो ह्या नांवाचा व्हेनिस शहरचा एक व्यापारी तेराव्या शतकांत ह्या देशांत प्रवास करित होता. तो पूर्व व पश्चिम ह्या दोन्ही किनाऱ्यांवरून प्रवास करीत फिरला; व शेवटीं कन्याकुमारी येथे मुक्काम करून त्याने आपले प्रवासवृत्त लिहिले. त्यांत त्याने असें ह्मटले आहे की “ कन्याकुमारीच्या आसोपास एका विशिष्ट प्रकारची माकडे आहेत. ती अगदी मनुष्यासारखी दिसतात.” ही जात हल्ली त्या प्रांतांत नाही पण जी होती ती गिलेडासारख्या जातीची होती की काय ? असल्या जातीच्या वानरांचे कळपांच्या कळप जर हुकमांत वागतील, तर लंका जाळणे, सेतु बांधणे, शिष्टाई करणे, राक्षस मारणे, इत्यादि गोष्टी विशेष अशक्यच आहेत असें कांहीं ह्मणतां येणार नाही. कालाचा फेरफार, हा मनुष्यमात्राच्या तर्काबाहेर आहे. तो कोणीकडे आणि कसा झुकेल हे कोण सांगणार ? .