या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. ( एका वर्गणीदाराकडून. ) TO धोलवडची अंबानी साक्या. जाम बहु नभचुंबित सुगंध तरुवर वेष्टित रम्य गडाला। सोडुनि भक्तास्तव जगदंबा आली धोलवडाला ॥ १ ॥ परी न गेली गांवामाजी बसली सन्निध रानी । भक्त येउनी करिति अलंकृत कंठ पुष्प-हारांनीं ॥ २ ॥ भरे तियेची यात्रा चैत्री शुक्लपक्ष पुनवेला । धांवति दर्शन सुधारसाचा प्राशाया जन पेला ॥ ३ ॥ कोणी अपुल्या खंद्या वारूवरती बसोनि येती। कोणी गो-हे जुंपुनि तांगे दवडित दडदड नेती ॥ ४ ॥ प्रेमानंदें चरणतलांनी कोणी पथ आक्रमिती । मार्गि दिसे ती शोभा वमुखें वर्ण कितीक मी ती ॥ ५ ॥ गोजिरवाणी कितिक बालकें जाती मौज पहाया । विडा दक्षणा जवळि घेउनी जगदंबेस वहाया ॥ ६ ॥ कितिक सुंदरी तरुण कन्यका तैशा वृद्धहि बाया । बसोनि यानी जाती होतिल की श्रम कोमल पायां ॥ ७ ॥ येतां नगराबाहिर लागति उंच आम्रतरु वाटे । जातां ज्याच्या शीतल छाये-खालुनि सुख बहु वाटे ॥ ८ ॥ तेथुनि पुढती जातां लागे इस्कनबनची झाडी । जींत असे जरिपटका आंबा बहुत जयाला गोडी ॥ ९ ॥ असति लागले जेथें सुंदर आम्रवृक्ष घनदाट । नसे जयामधिं रविकिरणांतें तिळहि रिघाया वाट ॥ १० ॥

  • सदरहू कवितेत छंदाच्या संबंधाने पुष्कळच फेरफार करावा लागला. त्याच त्यांतील सरलता, व सृष्टिसौंदर्यवर्णनाची हातोटी ही सुश्राव्य आहेत.