या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. अंबराइच्या मधेच आहे तुडुंबलेली वापी । घट घट घट घट शीतल जल तें करुनि तृषित जन आ पी ॥११॥ सुगंध शीतल वाहति झुळुका मंद मंद पवनाच्या । हृदयकमल तैं प्रफुल्ल होते पाहुनि श्रीस वनाच्या ॥ १२ ॥ पुढती जातां वाडी लागे जवळ पानसाऱ्यांची। आज हरी तृषा पुष्करणी जेथें मधुर जलें साऱ्यांची ॥ १३ ॥ अश्वत्थाचा जवळचि तेथें एक सुबक तरु आहे । उभारूनि जो उंच आपुलें कर पथिकांतें बाहे ॥ १४ ॥ असे तयातें बांधियलेला लांब रुंद जो पार । जाजर बसावयाला देउनि आसन सतत करी सत्कार ॥ १५ ॥ पाच हियासम रविकिरणांनी ज्याचे शिखर झळाळी । दक्षिण भागी दिसति जयाच्या थोर वावरें काळीं ॥ १६ ॥ उत्तरेस ओहोळ जयाच्या वाहे झुळ झुळ पाणी । करिती जेथे लोक आपुलें प्रक्षालन पदपाणी ॥ १७ ॥ चुंबिति नभ तरु विशाळ ऐसे असती जवळ जयाचे । जणों आदरातिथ्य करीती जे कां श्रांत जनाचें ॥ १८ ॥ सुंदर मंदिर पाषाणाचे समीप ये अंबेचें । तों जन दर्शन घ्याया उत्सुक होती जगदंबेचें ॥ १९ ॥ भुवनमंडपासमीप जातां अन्योन्यांचे हात । धरुनि उतरती चिरेबंदिच्या जाति पायऱ्या आंत ॥ २० ॥ गाभाऱ्यामधिं जाउन अंबे हळदकुंकुमा वाहोनी । वंदिति चरणां विडा दक्षणा सर्व पुढे ठेवोनी ॥ २१ ॥ पीत वसन कटिं नील कंचुकी आंगी सुंदर, भाळां । कुंकुम मळवट शोभति कंठी रक्त झेंडच्या माळा ॥ २२ ॥ निरखुनि ह्यापरि ध्यान प्रार्थिती जोडुनियां कर भावें । सदा सर्वदां असेंच माते तव दर्शन लाभावें ॥ २३ ॥ असें प्राथुनी पुनरपि वंदुनि येती मग बाहेर । ह्मणती माते; जाउ सासरी सोडुनि हे माहेर ॥ २४ ॥ २३