या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. १७९ कवि, शोधक रसिक असून बहुश्रुत असलेले वाचकांस माहित असणारच. ह्या सद्गृहस्थांनी वरील टीपेवर ता० १७ एप्रिल १८९५ रोजी एक आक्षेपयुक्त पत्र लिहून ते वर निर्दिष्ट केलेल्या मासिक पुस्तककारांकडे अर्थात् रा. ओक ह्यांजकडे पाठविले. तें पत्र त्यांनी आपल्या मासिकपुस्तकाच्या ७४ व्या अंकांत छापले आहे. ह्या पत्रांत श्रीमंतांनी असें झटले की “आपण केलेले विधान अगदी विसंगत दिसते. हे शोधकांचे मत नसून केवळ अशोधकांचे आहे असें ह्मणावे लागते." MS . हे ह्या वादाचे मूळ. ह्याप्रमाणे श्रीमंत बापूसाहेबांनी 'बाप दाखीव, नाहीं तर श्राद्ध कर' अशा प्रकारें 'अर्वाचीन शोधकांस' 'पेंचांत' धरल्यामुळे रा. रा. ओक ह्यांस साहजिकच साधार उत्तर द्यावे लागले. ते त्यांनी त्याच अंकांत दिले आहे. ओकांची विद्वत्ता, वाचन, रसिकता, व वाद करण्याची हातोटी ही तर निबंधमालेपासूनच लोकप्रसिद्ध आहेत. आणि प्रस्तुत प्रसंगी तर त्यांचे घोंगडे त्यांच्या गळ्यांत येऊ लागलेले, तेव्हां ते काय स्वस्थ बसणार ? त्यांनी तब्बल ३२ पेजांचें एक लांबच लांब पत्र लिहून आपल्या मताला पुष्टी दिली आहे. त्यांचा तो प्रयत्न पाहून जीव अगदी थक्क होऊन जातो. आणि त्या अचाट उद्योगाबद्दल तारीफ केल्यावांचून रहावतच नाही. त्यांनी प्रथमतः वाल्मिकी रामायणाच्या आधारें रामाचा मार्ग, प्रवास, व मुक्काम आपल्या मताप्रमाणे निश्चित करून त्याचा एक नवा नकाशा ह्या पत्रास जोडला आहे. नंतर तोच नकाशा, व त्याच नकाशांतील स्थलनिर्देश खरा हे सिद्ध करण्यासाठी (१) प्राचीन संस्कृत ग्रंथ, नाटके, वगैरे; (२) अर्वाचीन शोधक लोकांचे लेख; (३) नासिक हे रामायणीय जनस्थान नव्हे अशा प्रकारची बाधक प्रमाणे; (४) लोकवार्ता व दंतकथा; अशा प्रकारचे चार ( आपल्या मताप्रमाणे) 'भक्कम' व 'सत्य' पुराव्यांची रेलचेल करून दिली आहे. आणखी संस्कृत, प्राकृत व इंग्रजी अशा साठ सत्तर ग्रंथांची आपल्या तर्फेची हाणून यादी दिली आहे ती वेगळीच. येवढ्या जय्यत तयारीने बाहुटा चढवून प्रतिपक्षाने जेव्हां मोर्चा बांधला, तेव्हां अर्थातच रणदुंदुभी पुढे करून आपली बिनी अघाडीस चढविण्याचा बोजा श्रीमंतांवर येऊन पडला. श्रीमंतांच्या अनेक गुणांबद्दल, संस्कृत परिचयाबद्दल, विद्वत्तेबद्दल आमचे महाराष्ट्र वाचकही कांहीं अनभिज्ञ नाहीच. तेव्हां त्याप्रमाणे आपल्या समानशील सबळ प्रतिपक्षांस पाहून श्रीमंतांसही स्फुरण चढले