या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. व त्यांनीही आपली करामत दाखविण्याचे मनांत योजिलें; व त्याप्रमाणेच मुद्देसूद व शेरास सव्वाशेर असें सुमारे ४५ पानांचे पत्र लिहून तयार केले. आतां पाठविणार, इतक्यांत महदुःखाची गोष्ट ! की असले विद्वद्रत्न में रा. रा. ओक तें कैलासवासी झाल्याची वार्ता श्रवणीं पडली! त्यामुळे श्रीमंतांच्या मनाचा उत्साहभग झाला, ह्यांत मोठेसें नवल काय ? परंतु सर्व महाराष्टांतील जिज्ञासु व रसिकाचाही उत्साहभंग झाला! ईश्वराची इच्छा! 'ठेवीले अनंतें तैसेंची रहावें, चित्ती असों द्यावें समाधान ॥' असाच प्रसंग आला. हे श्रीमंतांचे उत्तर जर आकाना पाहिले असते, तर ते स्वस्थ बसले नसते, येवढेच नव्हे, तर आकाशपाताळ एक करून सोडले असते. व त्यावर पुन्हा चाल करून धुमाकूळ उडविण्यात श्रीमतही असमर्थ होते असे नाही. त्यांनीही आपलें समरकौशल्य, व यद्धचापल्य दाखवन प्रतिपक्षीयांस सुद्धां क्षणभर आश्चर्यचकित १ सत. आणि दोन मदोन्मत्त हत्तींच्या टकरा व्हाव्यात, किंवा दोन मल्लांच्या कस्या लागाव्यात. किंवा दोन रणरंधर वीर कडनिकडीस यावत; ११ १९सतासारख्या बारिस्टरांचा कडाक्याचा वाद व्हावा; त्याप्रमाणे ह्या विद्वद्वारांच्या वाग्युद्धपटत्वाच्या रमणीयतेने सर्व महाराष्ट्र देश डुलत राहिला - सांप्रतचे जिज्ञासु व शोधक लोक ह्यांची अंत:करणे प्रफुल्लित झाला असता. न मात्र संशय नाही. तो लाभ खरोखरच फार अप्रतिम, अपूर्व, केवळ अद्विवाय. असा झाला असता. पण त्या सर्वांस आह्मी निखालस आंचवलों! मग आमताच्या मनाचा उत्साहभंग होईल, उदासीनता प्राप्त होईल, ह्यांत आश्चर्य त काणत ? ते तर बोलून चालून खुद्द प्रतिपक्षी पडले. आणि प्रतिपक्षी हटला का, त्यास आपल्या आक्षेपावर उलट पक्षाकडून काय उत्तर येते, हे ऐकण्याची उत्कंठा व लालसा मोठी व त्यापासून होणारा आनंद केवळ अप्रतिम. येवढेच नव्हे तर, उलटपक्षाचा कोटिक्रम ऐकला, की आपल्या सर्व श्रमांचें सार्थक झालें असे वाटते. श्रीमंतांस प्रत्युत्तर ऐकण्याचा प्रसंग येणे तर लांबच, पण इतका वेळ, इतकें चातुर्य, इतका शोध. इतके परिश्रम करून तयार केलेली कृति, ती त्यांच्या 'एकांत मित्राच्या कानावरही गेली नाही! तेव्हां सहजच ह्या दुर्देवी पत्राला गांठ मारलेल्या दप्तरांत आजपर्यंत तोंड लपवून बसावे लागले ! तरी आमची-आह्मां महाराष्ट्रीयांची पूर्व पुण्याई थोडीशी शिल्लक होती. ह्मणून श्री. मंतांचे दुःख जनरीतीप्रमाणे हळू हळू कमी होऊन 'आमचे एकांतमित्र विद्वद्वर्य ओक गेले; त्यांच्याकडून उलट उत्तर मिळण्याची आशा खुंटली; तरी वाचक