या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १८९८. २३५ प्रमाणे सुरवंटांच्या वकिलांनी आपले फीचे वगैरे सर्व पैसे वसूल करून जिकडच्या तिकडे झाले. आणि सुरवंटही हळू हळू नाहीसे झाले. - इ० स० १९८७ मध्ये पुन्हां सुरवंटांची फौज आली. आणि पूर्वीप्रमाणेच द्राक्षांच्या मळ्यांचा सप्पा उडविला. शेतकऱ्यांनी पुन्हां जज्जकोर्टात दावा आणिला. तेव्हां जज्जानें, वादींनी प्रतिवादींची, ह्मणजे सुरवंटांची विनाकारण पुन्हां आगळीक केली असें ठरविलें. वादींनी अशी विनंति केली की, “ सरकार जर सर्व प्रतिवादींस हांकून लावील, व पुन्हां ते आमचे नांव न काढतील अशी तजवीज करील, तर त्यांस आह्मी निराळी जमीन देऊन तेथे त्यांस खाण्याच्या सामुग्रीची वगैरे सर्व तजवीज करून देऊ.” परंतु ते कांहीएक मनास न आणतां जज्जांनी त्या झालेल्या आगळिकीबद्दल वादींना दंड ठरविला तो असा. "वादींनी प्रतिवादींस विनाकारण त्रास दिल्याबद्दल आपल्या उत्पन्नापैकी दहावा हिस्सा द्यावा; कोर्टीत झालेला सर्व खर्च भरून द्यावा व झालेल्या पातकाच्या निरसनार्थ साऱ्या सुरवंटांस पूर्वापार चालीप्रमाणे तीन प्रदक्षिणा घालाव्यात." त्याप्रमाणे सर्व झाले. दशांश उत्पन्नाचा हवाला पटविला; कोर्टखर्चाची रक्कम भरली; व प्रदक्षिणेचे प्रायश्चित्तही घेतले. परंतु तेवढ्यानेच कांहीं संपले नाही. प्रतिवादींची-अर्थात् सुरवंटांच्या तर्फेचीजी वकिलांची जोडी होती, त्यांतील एक रेमबाड ह्मणून होता. तो मोठा हशार. व तरतरीत दिसे. तो एवढ्यासही मान्य होईना. त्याने आणखी चमत्कारिकच तक्रार काढिली. तो ह्मणाला जगातील सर्व प्राणिमात्रांमध्ये अत्यंत सुशील ज माझें कूळ सुरवंट त्याच्या तर्फेने आपल्यासच नव्हे तर सामान्य प्रतीच्या-मनुष्यास सुद्धां हैं दिसून येईल की, पशू-पक्षी-सुरवंटासारखे कृमिकीटक, ह्यांस कांहीं प्रत्यक्ष रीतीने कोर्टापुढे हजर होता यत नाही. तरी धर्मपस्तकाच्या आधारावरून एवढे सिद्ध होते की,-वनस्पति-अर्थात द्राक्षीचे वेल, हे जसे मनुष्याचे भक्ष्य आहे, त्याचप्रमाण इतर पशुपक्ष्यांचं-कृमिकीटकांचेही भक्ष्य आहे. ह्याकरिता प्रतिवादींनी वादींच्या मळ्यांतील द्राक्षींचे वेल खाल्ले ते कायदेशीर रीतीने व न्यायाच्या हक्कानेच खाल्लेले आहेत. ह्यास्तव प्रतिवादींकडे कोणताही अपराध नसल्यामुळे, हा