या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. आहेत; त्यांना तरी आपला पक्ष कळेल व ते तरी आहे एवढ्यांत सत्यासत्याचा निर्णय करतील' असा विचार सुचून सुदैवाने आपला पक्ष लोकांपुढे आणण्याची त्यांच्या अंत:करणांत प्रेरणा झाली. त्याप्रमाणे त्यांनी वादाची मूळ साकी, तिच्यावर रा, ओकांनी दिलेली टीप, त्यावर आपण काढलेले आक्षेप, त्यापुढे ओकांनी केलेलें सविस्तर प्रतिपादन, व त्यावर आपल्या पक्षाचा भक्कम पुरावा ही सर्व एकाच पुस्तकांत छापून 'पंचवटीस्थलनिर्णय ' ! ह्या नांवाचे पुस्तक छापून प्रसिद्ध केले, व त्याची एक प्रत कृपा करून आमच्याकडे पाठविली. तो आह्मांवर अनुपम प्रसाद झाला असें आह्मी समजतो, व त्याबद्दल श्रीमंत बापूसाहेब ह्यांचे शतशः उपकार मानतो. E आतां रीतीप्रमाणे ह्या पुस्तकावर अभिप्राय देणे हे आमचे कर्तव्य होय. तें करावयाचे. परंतु सदरहू पुस्तकावर अभिप्राय द्यावयाचा ह्मणजे सत्यासत्याचा निर्णय करावयाचा, किंवा एकाचा पक्ष सबळ व दुसऱ्याचा दुर्बळ हाणून सांगावयाचे. अर्थात् एकाचा जय व दुसऱ्याचा अपजय हे सिद्ध करायाचे. हे काम अत्यंत बिकट आहे. कारण, एका बाजूला श्रीमंतांसारखें विद्वान् प्रस्थ; आणि दुसऱ्या बाजूला ओकांसारखें विद्वान् प्रकर्ण. तेव्हां ह्यांपैकी एकास श्रेष्ठ ठरविणे झणजे उजवा हात व डावा हात; उजवा डोळा व डावा डोळा; तंतुवाद्य व गायना किंवा चंद्र आणि सूर्य ह्यांची प्रतवारी लावण्याप्रमाणेच दुर्घट होय. किंवा एकीकडे सार्जेट बालेंटाईन व एकीकडे ऑनस्टी; एकीकडे वसिष्ठ व एकीकडे विश्वामित्र; एकीकडे बृहस्पती व एकीकडे शुक्राचार्य असे पूर्वपक्षी उत्तरपक्षी असले, झणजे न्यायाधीशास न्याय तोडण्याचे जसें संकट, तद्वतच आमच्यावर आज पाळी आहे. खरा विचार झटला झणजे कसेही असले तरी यथाशक्त्या यथामत्या आह्मीं आपला अभिप्राय सादर करावा हे उचित होय. पण तसें क. रावयाचें मनांत आणले की, दोन संकटें पुढें दत्त करून उभी राहतात. ती ही की, एका पक्षाकडे विद्वान् , रसिक, शोधक आणि श्रीमंत आहेत, आणि दुसया पक्षाकडे विद्वान् , रसिक, उद्योगशील असा विद्वान् असून तो इहलोकपरित्यागी आहे. तेव्हां रा. ओकांच्या पक्षाकडे आमच्या मनाचा कल धांवला, तर त्यांत कांहीं वावगे होणार नाही. कारण, ओकांसारख्या विद्वानाच्या पश्चात् त्यांची थोडीशी बाजू राखिली, कृतज्ञताबुद्धीने त्यांच्या गुणानुवादांत अल्पस्वल्प भर घातली, व पूज्यबुद्धीने यत्किचित् सेवा करून तरी येवढ्या सन्मान्य गृहस्थाचे आह्मी उतराई झालों असें होईल. पण असें न होतां, आमचा कल जर