या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. १८३ आझांस उचित आहे. असे न करूं तर कृतघ्नतेस पात्र होऊ. तिसरे कारण हे की, कै० ओक ह्यांची मनापासून अशी इच्छा होती की, आपले लेख लोकांनी मनःपूर्वक अवलोकन करावेत, त्यांची चर्चा व्हावी, त्यांजवर आक्षेप काढावेत, व आपल्या लोकांत सद्वादविवादाची पद्धति निदान जागृत तरी असावी. मग अ. न्यांची मते आपल्यास अनुकूल असोत की नसोत. तेव्हां आमचा हा क्रम कसाही त्यांस साधक बाधक असला तरी, त्यांच्या हेतूस अनुसरूनच होईल; व ह्या कर्तव्यास आह्मी विन्मुख झाल्यास ओकांच्या परलोकांतील आत्म्यासही संतोष होणार नाही. इत्यादि विचारांचे पाठबळ घेऊन आह्मी आपल्या कामास सुरवात करतो. प्रथमत: वादी व प्रतिवादी; त्यांचे सामर्थ्य व योग्यता; वादाचा उपस्थित विषय व त्यावरील आक्षेप; त्याबद्दल थोडक्यांत-संक्षेपत:-परंतु एकवार पुनरुच्चार करून नंतर पूर्वपक्षाने दाखविलेल्या आधारांचा क्रम; व त्यावरील उत्तरपक्षाचे खंडन, व सामील केलेले जादा ग्रंथ ही प्राधान्यत्वेकरून दाखल करून त्यावर त्याच क्रमाने साधक बाधकांचा विचार करावयाचा असें योजिलें आहे. ह्यांत कै. रा. रा. वामन दाजी ओक हे पूर्वपक्षी किंवा वादी होत हे पूर्वी सांगितलेच आहे. हे रायपुरास हायस्कुलावरील हेड मास्तर होते. ह्यांस इंग्रजी, संस्कृत व मराठी ह्या भाषा उत्तम प्रकारे अवगत होत्या. मराठी कवितांवर त्यांचा दृढतर व्यासंग होता. ते मोठे रसिक व मार्मिक असून स्वतः कवि होते. वि. ज्ञा. वि. मासिक पुस्तकांत 'श्रीमन्माधवनृप. निधन ' काव्य ह्यांनी रचलेलें छापून प्रसिद्ध झाले आहे. ते फार रसभरित, सरळ, व गोड असून प्रसादाने भरलेले आहे. ह्याशिवाय 'काव्यमाधुर्य' गणपतिनिधनकाव्य, लार्ड बेकनचे चरित्र, नानकचरित्र वगैरे दुसरेही ग्रंथ उत्तमांपैकी आहेत. प्रसिद्ध निबंधमालाकारांशी मोरोपंतांच्या कवितांसंबंधानें ह्यांनी बराच कडाक्याचा वाद केला होता, व त्यांत त्यांची शोधकता, वाचनहव्यास, विद्वत्ता, मार्मिकता, ही उत्तम प्रकारे व्यक्त झाली. कै. जावजी दादाजी ह्यांनी सुरू केलेले सुंदर मासिक पुस्तक 'महाराष्टकाव्यसंग्रह' हे प्रथम रा. रा. जनार्दन बाळाजी मोडक हे चालवित असत. त्यांच्या पश्चात् ते काम त्यांच्याहून उत्तम रीतीने आपल्या हयातीपर्यंत रा. ओक ह्यांनी चालविले. त्यांतील विपुल टीपांवरून संस्कृतांतील व ऑग्लभाषेतील अलंकारशास्त्र, प्राचीन अर्वाचीन मतें, स्थल व कालनिर्णयात्मक कल्पना इत्यादि