या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. ..... 'लंका सांप्रत उपलब्ध नसेल हे निराळे. पण लंका सिंहलद्वीपाहून वेगळी हे खास वाटते." ह्यावरून-लंका हेच सिंहलद्वीप, व राम राहिलेले जनस्थान नासिकाजवळील पंचवटी असें ह्मणतात ती भ्रांति आहे. राम हे गोदावरीच्या मुखाजवळील पंचवटींत ( राजमहेंद्रीजवळ ) होते. हे अर्वाचीन शोधकांचे मत ओक सांगतात येवढेच नव्हे, तर 'अर्वाचीन शोधक ग्रंथकारच ' त्यांस 'विशेष मान्य आहेत.' व त्यांचे पुरावेच 'सत्य' असे त्यांच्या मनाने गृहीत धरले आहे. श्रीमंतांचे हणणें-हे मत शोधकांचे नसून अशोधकांचे आहे. राम राहिलेली पंचवटी नासिकाजवळचीच गोदेच्या उगमाजवळचीच खरी. मुखाजवळची बनावट पंचवटी धरल्यास सारें विसंगत होते. प्राचीन सर्व कवि अडाणी ठरतात, आणि रामयात्रेचा क्रमही बिघडतो. आणि सिंहलद्वीप ही लंका नव्हे. लंका निराळी असली पाहिजे. ही पूर्वपक्षाची आणि उत्तरपक्षाची मूळ पीठिका झाली. ह्यानंतर पूर्वपक्षसमर्थनार्थ ओकांनी ३२ पृष्ठांचे एक लांबचलांब पत्र व एक नकाशा दिल्याचे पूर्वी सांगितलेच आहे; व त्यावर श्रीमंतांचे भक्कम पुराव्याचे खंडनपर ४५ पृष्ठांचे प्रत्युत्तर आहे. ओकांनी आपल्या तर्फेच्या ह्मणून ६०।७० इंग्रजी, मराठी व संस्कृत ग्रंथांची यादी वाचकांपुढे टाकिली आहे. श्रीमंतांनी ती सर्व लक्ष्यपूर्वक चाळून आणखी आपल्या पुराव्याचे १०१११ जादा ग्रंथ पुराव्यांत दाखल केले आहेत. तेव्हां एकाने ५०।६० ग्रंथ, तर दुसऱ्याने ते सर्व धुंडाळून आणखी दहा बारा वर लादले; अशी धेडे जेथे वादास प्रवृत्त झाली आहेत, तेथे त्यांच्या वादांचा निर्णय करणाराने निदान पांच चारशें तरी ग्रंथ धुंडाळले पाहिजेत हे उघड आहे असें सकृद्दर्शनी वाटते. परंतु आमच्या मते तशी कांहीं आवश्यकता नाही. कारण, ह्यांत सत्य निवडून काढण्याचा उद्देश आहे, विद्वत्ता प्रदर्शित करण्याचा उद्देश नाही. अनुकूल प्रतिकूल ग्रंथ होते नव्हते तेवढे धुंडाळण्याचे काम डोळ्यांत तेल घालून उभय पक्षकारांनीही केले आहे; व साधक बाधक वचनें पुढे आणून ठेविली आहेत. त्यांत सयुक्तिक कोणती व अयुक्तिक कोणती ते ठरविले झणजे झाले. आणि तेवढें काम करावयाला आंगांत साधारण सारासारविवेचनशक्ति असली झणजे पुरे होईल असें आ१ पंचवटीस्थलनिर्णय' पान २८ (ब) ओळ ५।६ व ९ पहा. २४