या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. मचे मत आहे. आतां खरें मटले ह्मणजे उभयपक्षी पुराव्यांत आलेले समग्र ग्रंथ निर्णय करणारानेही पुनरपि चाळावेत, बारकाईने मागे पुढे आणखी काही साधकबाधक वचने आहेत की काय ते पहावें, व कोणी कांहीं आपल्या तर्फेनें दडपादडपी केली आहे की काय, ह्याचाही तल्लास लावावा हे योग्य आहे. परंतु ती गोष्टही केवळ अशक्य होय. कारण, ओकांनी ज्या ग्रं. थांची यादी पुढे केली आहे, त्यांपैकी कित्येक ग्रंथ श्रीमंतांसारख्यांस सर्व अनु. कूलता असूनही उपलब्ध झाले नाहीत, मग आमच्या सारख्या दूरदेशी राहणाऱ्यांस ते मिळावेत कसे ? तेव्हां समग्र ग्रंथ पहावयास मिळणे हेच आधी दुरापास्त आहे. दुसरें तें सारें लक्ष्यपूर्वक चालावयाचे झणजे कसलाही उद्योगी व रिकामा माणस असला तरी, त्याची छाती दडपल्यावाचून रहावयाचा नाही. आमच्या कोकिळाची प्लेग वगैरे संबंधाने आधीच तारांबळ झालेली, आणि तशांत हे काम अंगीकारले, ह्मणजे मग पहावयास नकोच. तेव्हां हे सर्वच आहाराबाहेरचे आहे. पण आझांस वाटते तसे करण्याची इतकी जरूरही पण नाही. कारण, दोन्हीही पक्षकार सत्याचे चहाते व असत्याचा अपलाप न करणारे असे आहेत. तेव्हां अशा क्षुद्र कल्पना मनांत आणल्यास आमच्या कडेच न्यूनता येईल, ह्यास्तव तशा प्रकारच्या कोणत्याही भानगडीत न पडता, ओकांच्या पूर्वपक्षाकडील चचने देऊन त्यापुढे श्रीमंतांच्या उत्तरपक्षाचे खंडन, व त्यानंतर त्यांची अधिक वचने देऊन त्यांतील सत्यासत्याचे विवेचन करता. परंतु ही सर्व वचने देणे ह्मणजे तें सबंध पुस्तकच उतरून घेणे होईल. ह्याकरितां त्या वचनांचें संक्षेप-नव्हे अतिसंक्षेप-करणे अवश्य आहे. प्रधान वचनें तेवढी घेऊ, आणि लहान सहान वयं करूं. आणखी, प्रधान वचनें घ्यावयाची ती सुद्धा सबंध उतरून न घेतां, त्यांतील मुख्य मुद्याचें व सारांशाचें वाक्य तेवढेच घेऊ. अधिक मौज पहाणे असेल त्यांनी हे 'पंचवटीस्थलनिर्णया' चे पुस्तक अवश्य पहावें. वरील वादाची साधक बाधकें येणेप्रमाणे आहेत: १. हल्लीचें सिंहलद्वीप हीच लंका होय. हे सिद्ध करण्याकरितां रा० ओक ह्यांनी कै. ज. बा. मोडककृत 'भास्कराचार्य व तत्कृत ज्योतिष' ग्रंथांतील 'निरक्ष. देशात् क्षितिषोडशांशे' इत्यादि श्लोक व त्याजवरील मोडकांच्या टीपा दिल्या आहेत. श्रीमंतांचे ह्मणणे 'क्षितिषोडशांशे' ह्याचा अर्थ १६ अक्षांशावर असा केला आहे ती चूक आहे. पृथ्वीच्या सोळाव्या अंशावर असा पाहिजे. ह्याला दुसरे प्रत्यक्ष प्रमाण त्यांच्याच श्लोकाच्या उत्तरार्धाचें. त्यांत त्याला १६ नी गुणलें असतां