या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. सर्व पृथ्वीचा परिच येईल' असे साफ ह्मटले आहे. ह्यावरून हल्लीचे सिंहलद्वीप ही लंका नसून, लंका ही त्याच्या दक्षिणेस सात अंशांवर असली पाहिजे, ही गोष्ट निविवाद झाली हे सांगणे नकोच. ती खोडून काढण्याला ब्रह्मदेवालाही मार्ग उरला नाही. येवढ्या घोडचुक्या-ओक व मोडक-ह्या उभय विद्वानांच्या हातून कशा राहिल्या ह्याचें नवल वाटतें. क्यांडी शहर हीच लंका ह्यास कोणतेही प्रमाण नसतां तो सिद्धांत गृहीत धरावयाचा, 'क्षितिषोडशांशे' याचा अर्थ सोळा अक्षांश करावयाचा, आणि तेथून उज्जयनी प्रस्तुत १६ अंशांवरच असून भास्कराचार्य तेवीस अंशांवर मानतात ह्मणून, व उज्जयनीवरून नेलेलें याम्योत्तर तिरकस होतें, ह्मणून त्यांस अडाणी ठरवावयाचे या धाष्टास काय ह्मणावें? त्यापेक्षां लंका में प्रस्तुतचें क्यांडी शहर नव्हे, तर त्याच्या पलीकडे सात अक्षांशावर कोणतें तरी एक शहर पूर्वी असावें असें धरल्याने जर उज्जयनीचें अंतर, व याम्योत्तरवृत्ताचा तिरकसपणा मोउतो आहे, तर हेंच सयुक्तिक नव्हे काय ? पण त्यांत अर्वाचीन शोधकांची थोरवी व दुराग्रहाची झांक राहणार कशी? 'हल्लींचें सिंहलद्वीप हे जर लंका बेट असेल, तर जेथें प्रसिद्ध नासिकाजवळच्या गोदावरीचे ग्रहण करणे सयुक्तिक होणार नाही.' असे ओकांचे वाक्य आहे. तेव्हां तसे नसेल तर नासिकाजवळच्या गोदावरीचें ग्रहण सयुक्तिक होईल असा त्यांचाच ध्वनितार्थ झाला. आणि त्यांच्याच ह्मणण्याप्रमाणे त्यांचा पक्ष खोटा पडला हे उघड दिसतें. 'प्रथमग्रासे मक्षिकापातः' ह्या न्यायाने पहिल्या पवित्र्याबरोबरच ओकांची पाठ जमिनीस लागावी, ही अत्यंत खेदाची गोष्ट होय. असो. पण पुढे पाहूं या. २. नंतर आरंभींच रा. ओक ह्यांनी आपण किती ग्रंथ चाळले, किंवा आपल्या पक्षास किती ग्रंथांचे पाठबळ आहे, हे दाखविण्याकरितां 'काही मित्रांच्या सूचनेवरून' सुमारे ३०।४० ग्रंथांची यादी दिली आहे. तिची वासलात श्री. नी येणेप्रमाणे लावली आहे:। १७ ग्रंथ (प्रयत्न करूनही) मिळत नाहीत याबद्दल वाईट वाटतें. ६ ग्रंथांत पंचवटीसंबंधानें एक अक्षर सुद्धा नाही. 'मेघदूत' 'प्रसन्नराघव नाटक' 'भारतस्थलादर्श' इत्यादि ग्रंथ आह्मींही चाळून पाहिल्यावरून श्रीमंतांप्रमाणे आमचीही पण खात्री झाली आहे. १० ग्रंथांत दंडकारण्य, जनस्थान, पंचवटी, येवढी नांवें आढळ. तात. स्थलनिर्देश करण्याला काहीएक साधन नाही. बाकी उरलेल्या ग्रंथांचा विचार श्रीमंतांनी पुढे केलाच आहे. ३. वाल्मिकी रामायणाच्या आधाराने ओक यांनी दिलेला रामयात्राक्रम, व तदनुरोधाने तयार केलेला नकाशा ह्यांवर श्रीमंतांचें ह्मणणे-ओकांच्या ह्या परिश्रमाबद्दल बहुत उपकार आहेत. यात्राक्रम बरोबर आहे. परंतु स्थलदर्शक नकाशा मात्र आह्मांस बिलकूल संमत नाही. जनस्थान किंवा पंचवटी ही स्थळे, गोदेच्या