या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. १८९ आहे ती ही की, हजारों तीर्थीची त्यांत नांवें दिली असून पंचवटीतीर्थाचें नांव कोठेही नाही.' ह्यावर श्रीमंतांचा उत्तरपक्षः "परंतु सुदैवाने ह्याच माहात्म्यांतील १८ व्या अध्यायांत पंचवटीचा निर्णय आहे. तो असा. सूर्याचें तेज असह्य झाल्यामुळे त्याची पत्नी घोडीचे स्वरूप घेऊन वनांत तप करीत होती. सूर्य घोडा होऊन तेथे आले. सूर्य न जाणून आपल्या पातिव्रत्याचा भंग होईल ह्या भयाने ती फिरत फिरत जनस्थानांत आली; व तेथील पांच ब्राह्मणांच्या बटुंनी घोड्यास मागे परतविलें. ह्मणून सूर्यानी त्यांस वट व्हा असा शाप दिला. त्याप्रमाणे जेथे पांच वट झाले ती पंचवटी. असे असून ओक नाही ह्मणतात तेव्हां ओकांनी हे माहात्म्य किती काळजीपूर्वक तरी वाचलें!" ह्यावरून ओकांच्या पक्षाची काय दशा झाली, हे काही निराळे सांगणे नको. ५ आतां दुसऱ्या प्रकारचा पुरावा ह्मणजे अर्वाचीन शोधक लोकांच्या लेखांचा. ह्या संबंधानें ओक ह्मणतात " या पुराव्यासंबंधाने श्रीमंतांची कितपतशी मान्यता पडेल हे सांगवत नाही. कारण, त्यांच्या पत्राच्या झोंकावरून ते या अर्वाचीन शोधकांस 'अशोधक' समजतात असे दिसते. परंतु प्रथम प्रकारच्या पुराव्यांतील ग्रंथकारांपेक्षा हे अर्वाचीन शोधक ग्रंथकार आमांस विशेष मान्य आहेत.” ह्यावर श्रीमंतांचें उत्तर:-"आमचे मत असें असल्याचे ओकांनी कशावरून गृहित केलें ? आमच्या पत्रांत राम राहिलेली पंचवटी, नासिकाजवळची नव्हे, असें ह्मणणाऱ्यांच्या मतास 'अशोधकांचे' मत पटले आहे. 'पुराणमित्येव न साधु सर्व' इत्यादि वाक्ये माहित असूनही भलतेंच विधान आह्मीं केले, तर मोठाच प्रमाद होईल. आतां एवढेच सांगतों की, जुन्या किंवा नव्या अशा कोणत्याही वर्गास अनुलक्षून आह्मी लिहिलेलें नाही. फक्त भद्राचलंजवळच्या पंचवटीत राम होते हे ह्मणणे अप्रमाण आहे, एवढे आमचे मत आहे. ओकांनी मात्र जुन्या ग्रंथकारांपेक्षा अर्वाचीन ग्रंथकार आपल्यास जास्त मान्य असल्याचे साफ कबूल केले आहे." ओकांनी अर्वाचीन शोधकांचा 'विशेषमान्य' ह्मणून जो पुरावा दिला आहे, त्यांतील गुरुवर्य डा० भांडारकर ह्यांच्या 'दक्षिणच्या इतिहासांतील' एक इंग्रजी उतारा हा मुख्य आहे. त्यांतील सारांश: "जेथें राम रहात होता ती पंचवटी ह्मणजे नासिक; परंतु कवीने आपल्या नायकाला विंध्यापासून नासिकाइतक्या दूरस्थळी पश्चिमेस नेलें असेल, असे फारसे संभवत नाही. रामायणांत तसेंच उत्तररामचरितांत, जे वर्णन आहे त्यावरून पाहतां राम ज्या पंचवटीमध्ये राहत होता, तिच्या जवळ गोदा पुष्कळ रुंद असली पाहिजे. नासिक गोदेच्या उगमापासून फार जवळ आहे. तेथे ती रुंद असण्याचा संभव नाही." । ह्यावर श्रीमंत ह्मणतात "त्याच्याच खालच्या आणखी चार ओळी देण्याची ओ. कांनी कां बरें तसदी घेतली नाही ? त्या ओळी अशा आहेत."