या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. खटला काढून टाकण्याविषयी माझी विनंति आहे. एवढेच नव्हे, तर वादींनी प्रतिवादींची विनाकारण आगळिक केल्याबद्दल, त्यांनी त्यांस मोल्यवान् जडजवाहीर नजरनजराणा देऊन त्यांचा सत्कार केला पाहिजे." ह्यावर कोर्टानें ' तुमचे मणणे काय आहे ? ' ह्मणून वादींस विचारिले. तेव्हां त्याचा जबाब देण्याकरितां कोर्टापासून वादींनी एक महिन्याची मुदत मागून घेतली; व तेवढ्यांत असे सिद्ध केले की, किडे हे मनुष्यांच्या उपयोगाकरितांच ईश्वराने निर्माण केले आहेत. ह्याकरितां त्यांनीही आह्मांपासून विशेष जबर करभार घेऊ नये. व त्याकरितां त्यांनी आपआपसांतच तोड केली. साऱ्या शेतकऱ्यांनी मिळून एक पडित जमिनीचा तुकडा सुरवंटांच्या नांवानें सोडिला; व त्यांत त्यांनीं-हणजे सुरवंटांनी मर्जी वाटेल तर जाऊन रहावें ह्मणून ठराव केला! इ० स० १५८७ तील डिसेंबर महिन्याच्या २० व्या तारखेस ह्या खटल्याच्या खचोबद्दल १९ फोरिन्स शेतकऱ्यांस भरावे लागले. कारण, सुरवंटांकडे कांहींच इस्टेट नव्हती! ह्या काली कायदा फार खस्त होता; आणि शेतकरी लोकही सुखी होते, ह्मणून अशा मौजा चालत. या किड्यांवरच्या फिर्यादींस अकराव्या शतकापासून प्रारंभ झाला. आणि इ० स० १७३१ मध्ये-ह्मणजे गेल्या शतकांतचह्या संबंधाचा शेवटला खटला हो टला खटला होऊन हा खुळ्यांचा बाजार उलगडला !! दाउन शहरामय था पशुपक्ष्यांच्या व कृमिकीटकांच्या फिर्यादीचा निकाल करण्यासाठी एक कौन्सिलच नेमलेले होते. ते अर्जदाराची जमीन पाही; नुकसानीचा अंदाज चा अदाज करी; व आपला अभिप्राय जज्जास कळवी. पाप महाराज कधी कधी ह्या किड्यांस पिटाळन लावण्याचा कम फर्मावीत, किवा कधी कधीं कांहीं ठरीव दराने नुकसानीही भरून देत.