या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ८ वा. आगष्ट १८९८. १९१ | ।" ठीक आहे. पण नासिकाजवळही एक खरादिकांची राहण्याची जागा प्रसिद्ध आहे. त्यास हल्ली 'तीवधा' ह्मणतात. मिळून ओकांच्या विरुद्धही एक जागा आहे. ह्मणून हा सत्प्रतिपक्ष झाला.” "भद्राचलंकडे असलेली जगद्दलनपूर, राकापल्लो, राक्षसभुवन वगैरे राक्षस राहि. लेल्या द्योतकांची गांवें आहेत.:-" "होय. पण तशीच नासिकाकडेही राक्षसभुवन वगैरे गांवें आहेत.” "रथवगूता नांवाची एक टेकडी आहे. [ही भद्राचलंकडे असावी.] रथबगूता याचा अर्थ तैलंगी भाषेप्रमाणे रथाचा पहाड असा होतो. या टेकडीवरून रथांत घालून रावणाने सीतेस नेले. त्याच्या चाकोऱ्या पडलेल्या अद्यापि दिसतात असे लिहिले आहे.” " होय, असतील. पण इकडेही नासिकाजवळ जटायूने रावणाचा रथ मोडला. असलेले गाढवमुखी घोडे मारले. त्यांचे सांपळे अद्यापि पडलेले लोक दाखवितात. ते खोटे कां? आणि ओकांचा रथबगूताच खरा कां? मिळून हाही सत्प्रतिपक्षच झाला.” "पर्णशाळेजवळ रावण गोदा उतरला." "हे मात्र ओकांनी साफ खोटें लिहिले आहे. रामायणांत रावण आकाशमार्गाने गेला असे स्पष्ट आहे.” पूर्वपक्षः-" राम चित्रकूटाहून थेट नासिकास येता तर त्यास प्रथम दशार्ण, मग चेदिमंडल, नंतर दक्षिण कोसल, नंतर विदर्भ वगैरे देश लागतात, तर या देशांतून राम कधीच आला नसता." कारण काय तर ह्मणे "हे सर्व देश रामाच्या आप्तांचे, कोणी अजोळ, कोणी पणजोळ अशांच्या देशांतून खप्रतिज्ञाभंग केल्यावांचून रामास जातांच आले नसते.” "वः ! काय तर्क हा! प्रथम या ठिकाणी ओकांची केवढी चूक झाली पहा. मुळीं कौसल्या ही दक्षिण कोसल राजाची कन्या नसून ती उत्तर कोसलच्या राजाची कन्या. उत्तर कोसल देश अयोध्येजवळच आहे; व उत्तर कोसल तर ओलांडलाच पाहिजे होता. आणि तो उत्तर कोसल ओलांडण्यास रामास तीन चार दिवस लागले, असे प्रसन्नराघवांत स्पष्ट आहे तर या उत्तर कोसलांतून जातांना रामास प्रतिज्ञाभंग करावा लागला नाही. मग पणजोळांत तरी कां प्रतिज्ञाभंगाचे भय रामास वाटावें कळत नाही.” अशा प्रकारे पूर्वपक्षाचे खंडन केल्यानंतर ज्यांत जनस्थानासंबंधाने स्पष्ट उल्लेख आहे अशा १ श्रीगणेशपुराण, २ श्रीमुद्गल पुराण इत्यादि १० ग्रंथांतील वाक्ये दाखल करून श्रीमंतांनी आपला पक्ष दृढ केला आहे.