या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. १९९ अकस्मात् झाली. तो सुगावा महाराष्ट्रमंडळास सुद्धां फारसा लागलेला नव्हता. तेव्हां तो मलबारस्थ लोकांस लौकर न लागणे हे साहजिकच आहे. पाण्यासारखा पैसा तारांसाठी खर्ची घालूनही पुण्यांतील बातमी मुंबईस जावयास पहांट झाली ! व ती अनेक तारा एकत्र होईपर्यंत तेथील लोकांनाही विश्वसनीय वाटली नाही. तसा प्रकार कोचीस होणे हेही साहजिकच आहे. कोचीसही दुसऱ्या दिवशी एक दोन तारा आल्या होत्या, परंतु त्या कितपत खन्या असाव्यात ह्याचा कोणासच उलगडा होईना. कारण, ह्याच्या पूर्वी अनेक प्रसंगी नामदार मुक्त होणार, झाले, अशा प्रकारच्या वदंता उठल्या होत्या, व त्यांत निराशेवांचून दुसरें कांहीं हाती लागले नव्हते. ह्यामुळे ह्या समयींही कोणाचें मन उत्सव घेईना. एक दोन इंग्रजी पत्रांत ही बातमी प्रसिद्ध झालेली लोकांच्या कानांवर आली. तथापि साशंक वृत्तीची निवृत्ति होईना. अखेर जेव्हां शनिवारी प्रत्यक्ष केसरीच येऊन धडकला, तेव्हां एकदम सर्व जनांची मुखकमले विकसित झाली, आणि आनंदमकरंदानें दाही दिशा भरून गेल्या. खरोखर ना० टिळक हे महाराष्ट्रीय आहेत, तेव्हां त्यांचे नांव महाराष्ट्रांत सर्वतोमुखीं असणे ह्यांत नवल नाही. परंतु मद्रास इलाख्यांत सुद्धा त्यांचे नांव आणि कीर्ति सर्वत्र प्रसिद्ध आहे. आतां इतकें मात्र खरें, की त्यांची इत्थंभूत माहिती असलेले लोक फारच थोडे असतील. तरी, त्यांची अर्धीमुर्धी कीर्ति, गुण, ऐकलेली मंडळी फार. आणि नांव माहिती असलेली मंडळी बहुतेक सारीच झटले तरी चालेल, ही सर्व कीर्ति त्यांस इंग्रजी लेखांवांचून दुसरीकडून मिळालेली नाही हे उघडच आहे. त्यामुळे आमांस विचारतांना त्यांची जी त्रेधा उडते, ती काही विचारूं नये. मराठा प्रवाशी मद्रास इलाख्यांतील स्टेशनावर आला की पुरे. त्याच्या भोवती स्टेशनमास्तर, वगैरे मद्रासी कामगारांची झुंडच्या झुंड जमते. आणि 'तुझी मराठे काय ?' 'तुमचे टिळक हल्ली कसे आहेत ?' 'त्यांची सुटका होण्याची कांहीं आशा आहे काय ?' 'वः ! खरोखर फार थोर !' 'केवढा बाणेदार, केवढा परोपकारी, आणि केवढा विद्वान्' इत्यादि टिळकांच्या कळकळीचे मद्रासी लोकांचे उद्गार ऐकून, महाराष्ट्रीय गृहस्थाविषयी त्यांची येवढी पूज्यबुद्धि पाहून आपलें अंतःकरणही सद्गदित