या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९६ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. झाल्यावांचून रहात नाही. धन्य तो महात्मा ! की ज्याची मद्रास इलाख्यांत-परकीय भाषाभिज्ञांवर-सुद्धा येवढी छाप ! ह्यांच्या ह्या प्रश्नांत एक मात्र विशेष मौज असते. ती कोणती? तर 'टिळक' ह्या नामोच्चाराची. कोणी मिस्तर 'टिल्याक' ह्मणतो; कोणी 'टल्याक' ह्मणतो; कोणी 'टिलाका' ह्मणतो; कोणी 'टेल्याग' ह्मणतो; तर कोणी 'टालिक' ह्मणतो. उच्चाराची गोष्ट कशीही असो. प्रत्येकाच्या मनात त्यांचा जो अभिमान व पूज्यबुद्धि असते, ती अवर्णनीय असते, ह्यांत शंका नाही. ___कोचीमध्ये ना० टिळकांच्या मुक्ततेची बातमी ता० १७ सप्तंबर शनिवार रोजी टपारी सर्वतोमखी पसरली. आणि तथपासून लाक आनंदोत्सवाच्या तयारीस लागले. शनिवारी दिवसा काणासच काह। करण्यास वेळ झाला नाही. तरी त्या रात्रीपासून एक एक समारंभास सुरवात झाली. दिवस पहिला. शनिवार ता० १७ सप्तेंवर. रात्रौ परळ गांवांतील ग. रा. गोविंद पंडित ह्यांच्या श्रागापा १ मद्रास इलाख्यांतील लोक उच्चाराच्या बाबतींत अगदीच पेबळट आहेत. ह्याची मोज पाहणे असेल तर एखाद्या हिकडच्या इंग्रजी शाळेत जाऊन तेथील विद्याथ्याशी किवा मास्तरांशी हिस्टरीसंबंधांने प्रश्न काढावेत. ह्मणजे बाबरचे-बेबर-बाजि. रावाचे-बजिराव-डेहली झणजे दिल्ली; एकबरा-ह्मणजे अकबर, पिशवा-ह्मणजे पेशव इत्यादि अनक चमत्कार दृष्टीस पडतात. इंग्रजी एस अक्षराचा उच्चार ते भला लाब लचक 'स' करतात. त्यांत 'ज' चा संपर्क मिळावयाचा नाही. 'जेथे जातो तेथे हत्ता जाता; नाही तेथें मुंगी शिरकावयाची नाही' ही ह्मण इंग्रजीत 'Where goes goes elephant goes, where cant go ant cant go' अशी ह्मणावयाची तर तिचा उच्चार ते खाली लिहिल्याप्रमाणे करतातः "वेर गोस गोस एलेफंट गोस: वेर क्यांट गो अँट क्यांट गो !" ही तारांबळ केवळ इंग्रजी भाषेतच आहे असे नाही. संस्कृत भाषेचा मासलाही असाच. नव्हे ह्याहून थोडीशी कडी वरच झटले तरी चालेल. वस्तुतः इंग्रजी व संस्कृत ह्या दोन्ही भाषा महाराष्ट्राहून मद्रास इलाख्यांत विशेष प्रचारांत असतां, अशी दशा का असावी समजत नाही!