या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टंबर १८९८. १९७ कृष्णाच्या देवालयांत उत्सवास प्रारंभ झाला. देवाची पालखी निघाली; दीपोत्सव, मंत्रपुष्प, आरती, धुपारती करण्यांत आली. नंतर केरळकोकिळांचे माजी म्यानेजर रा. रा. बाळकृष्ण अनंत शास्त्री गोरे ह्यांचे कीर्तन झाले. समारंभास महाराष्ट्र ब्राह्मणसमुदाय बराच जमला होता. परंतु बातमीचा प्रसार व्हावा तितका न झाल्यामुळे, व उत्सवसमारभाचे नियमही, त्या दिवशी न ठरले गेल्यामुळे अन्य गृहस्थांस येण्यास संधि मिळाली नाही. कीर्तनामध्ये कांहीं आर्या वगैरे तत्काळ वक्त्यांनींच तयार केलेली पचे झणण्यांत आली; व पांडवांचा अज्ञातवास, व टिळकांस कारागृहवास ह्यांची तुलना हा विशेष प्रतिपादनाचा भाग होता. अखेर पांडवांच्या मुक्ततेपासून जसा जनांस आनंद झाला, तसाच टिळकांच्या मुक्ततेने सर्वांस आनंद झाला आहे, इत्यादि विषयाचें निरूपण होऊन कीर्तन समाप्त झाले. नंतर पेढे, पानसुपारी, पुष्पं वगैरे वांटून दिवस साजरा करण्यांत आला. दुसरा दिवस, रविवार. जाहिरसमा. रविवारी प्रातःकाळी तर अधिकच हालचाल दिसू लागली. रस्तोरस्ती व गल्लोगल्ली 'टिळक' 'टिळक' ह्या नामोच्चाराचा ध्वनि ऐकू येऊ लागला. मुलांची धावाधांव; खटपट्यांच्या खेपा; अज्ञलोकांची विचारपूस करण्याची तारांबळ इत्यादि पाहून केवळ लगिनघाईच आहे असे वाढू लागले. कुशल कारागीर रा. गोपाळ हरी जोशी ह्यांनी तयार केलेला एक भव्य बोर्ड समारंभाने बाहेर पडला. हा बोर्ड अतिशय शोभिवंत होता. मध्यभागी नामदार टिळकांची तसबीर असून दोन गोजिरवाणी मुले त्यांच्या गळ्यांत पुष्पांचे हार घालित आहेत असे दाखविले होते. सभोवार सुंदर अशा फलपुष्पयुक्त लता काढलेल्या होत्या, व मध्यभागी 'आनंदाची पर्वणी ! ना टिळकांची मुक्तता!!” “Joy ! unbounded joy! Release of Mr. Tilak" अशी इंग्रजी. मराठी व मलबारी ठळक अक्षरांनी दाखविलेली वाक्ये तर सर्वांच्या चित्तवृत्ति जणों काय जागृतच करित आहेत असे वाटे. बोर्डाच्या सभोवार रंगीबेरंगी तापत्यांची निशाण फडकत होती. हा बोर्ड अबदागिरीप्रमाणे उंच स्थाना