या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. वर धरलेला असून त्याच्या पुढे अनेक मंगलवाद्यांचा गजर चालू होता. त्याच्या बरोबरच इंग्रजी, मराठी, मलबारी जाहिरातींची पुडकी घेतलेली मुले, रंगीबेरंगी छापील जाहिराती वांटीत चालली होती. ही मिरवणूक तमाम रस्त्यांनी गेली. __जाहिरातींमध्ये ना० टिळकांच्या गुणांचें, लोकसेवेचें, धैर्याचे व दुर्धर प्रसंगाचे थोडेसे दिग्दर्शन असून त्यांची मुक्तता झाल्याबद्दल सर्वत्र आनंदोत्सव कसा झाला तेंही थोडक्यात सांगितले होते, व आह्मी त्यांचे थोडसे देशबंधु दक्षिणेच्या एका टोकांस आहों तरी, त्यांचा आनंदोत्सव व आभनदन करणे आमचे कर्तव्य आहे. करितां आज सायंकाळी चार वाजता श्रीबालाजीच्या हायस्कुलांत जाहिरसभा भरणार आहे. तेथें सवींनी आपआपल्या मित्रमंडळीसह अगत्य अगत्य येण्याची कृपा करावा. अशा विनंती होती. ह्या हस्तपत्रकावर श्री.रा.रा. हरी शणै; रा. रा. धारशीशेट; रा. रा. रामचंद्र महादेव गांवसकर: रा. रा. विष्णु केशवशेट सापळा रा. रा. जनार्दन गोविंद गोखले: रा. रा. विनायक अनंत गोर; रा. रा. दामजी उरवा, इत्यादि दहा बारा थोरथोर व प्रमुख गृहस्थांच्या सह्या होत्या; व त्यांत सभेमध्ये काय काय होणार. भाषणे, कविता वगैरे कोणकोणाच्या ह्याच्या कार्यक्रमाचाही उल्लेख होता. एका दिवसांत सवीनी एक होऊन येवढी तयारी केली, व सर्व जातींनी एकदिलाने अभिनंदन करण्याचे मनावर घेतले, ही गोष्ट खरोखरच फार भूषणावह आहे ह्यांत शंका नाही. दोन प्रहरी श्रीबालाजीहायस्कुलांत जारीने तयारी सुरू झाली. महाद्वारामध्ये पुष्पफलयुक्त कर्दळी उभ्या करण्यांत आल्या; आम्रपल्लव, नारिकेलपल्लव इत्यादि मंगलतोरणे बांधण्यांत आली. मोगरा, सोनचांफा इत्यादि पुष्पाच्या दुरड्याच्या दुरड्या भरभरून येऊं लागल्या. हारांचे ढिगांचे ढीग लागले. पेढ्यांची तबकें भरभरून येऊ लागली. गालिचे, संतरजा येऊन पडल्या. मधील दिवाणखान्यांत खुर्सा, बाकें वगैरे बैठकी शि.. स्तीने लावल्या. अध्यक्षांसाठी मध्यावर एक उच्च जागा तयार करून त्यापुढे टेबल ठेवले. त्यावर उत्कृष्ट चादर, पुष्पपात्रे वगैरे सामान व्यवस्थित रीतीने मांडले. समोरच्या भिंतीवर एक मोठे भव्य व सुंदर हत्तीचे चित्र लावून त्याच्या पाठीवर ना० टिळकांची आरशांत बसविलेली