या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. १९९ तसबीर टांगली, व तिच्या गळ्यांत मोगऱ्याचे हार घातले. सभोंवार सोनचाफ्याची फुलें बसविली होती. जाहिरातीचा बोर्ड ग्रामप्रदक्षिणा करून महाद्वारापाशी येऊन उभा राहिला. चौघडे वगैरे वायें झडतच होती. तीन वाजतांना हळू हळू मंडळी येण्यास सुरवात झाली. साडेचार वाजण्याच्या सुमारास धारशीशेट, गांवसकर, सांपळे वगैरे मोठमोठ्या मंडळीच्या गाड्या येऊन थडकल्या; आणि उत्तरोत्तर लोकसमुदाय वाढत चालला. एकंदर सुमारे तीनशे लोक असावेत असा अदमास आहे. मंडळी जमल्यानंतर रा. रा. बाळकृष्ण अनंत गोरे, ह्यांनी 'बहुतेक मंडळी आली. ह्यासाठी आतां सभेच्या कामास सुरवात व्हावी' ह्मणून सभेस विनंती केली. तेव्हां 'आजच्या सभेचे अध्यक्षस्थान भाऊसाहेब गांवसकर ह्यांनी सुशोभित करावे, अशी 'कोकिळा' कडून सूचना पुढे आली. तीस रा. रा. विनायक शास्त्री गोरे, रा. रा. विष्णुशेट सांपळे इत्यादि सद्गृहस्थांनी अनुमोदन दिल्यानंतर रा. रा. रामचंद्र महादेव गांवसकर हे अध्यक्षांच्या स्थानावर जाऊन विराजमान झाले. इतक्यांत बाहेर दहा खोदन्यांची सरबत्ती झाली, व सर्व लोकांनी आनंदप्रदर्शक टाळ्यांचा गजर केला. अध्यक्षसाहेबांनी सभा भरण्याचा उद्देश कळवून हस्तपत्रकांतील सारांश सांगितला; व आतां ठरल्याप्रमाणे आपणांस नामदार टिळकांची माहिती वक्त्यांकडून मिळेल, ती श्रवण करण्याविषयी सर्वांस विनंती केली. नंतर 'केरळकोकिळ 'च्या भाषणास सुरवात झाली. 'कालचक्र हे एक रहाटगाडगे आहे. दिवसामागून रात्र, आणि रात्रीमागून दिवस; सुखामागून दुःख, दुःखामागून सुख; अशीच ही सारी द्वंद्वे फिरत रहावयाची. त्यांस कधी खळ ह्मणून नाही. चढणे आणि पडणे हे जसे रहाटगाडग्याच्या मागे लागलेले आहे, तसे ते जगाच्या . आणि मनुष्याच्या मागे लागलेले आहे. ते कधी टळावयाचे नाही. आजचा हा समारंभ आनंददायक आहे खरा, तरी त्याच्या मागें दुःख होते १ ही हकीकत लिहितांना 'कोकिळा'कडे कोणी आत्मस्तुतीचा दोष लावतील. पण त्योस निरुपाय आहे. ही गोष्ट मनी आणून तशी कल्पना करणारे वाचक त्यास क्षमा करतील अशी आशा आहे.