या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. तें विसरता कामा नये. तथापि तेवढ्यावरून ह्याची किंमत कमी तर नाहीच, पण उलटी अधिक मात्र आहे. कारण, उन्हांत तापले ह्मणजे छाया अधिक शीतल वाटते; क्षुधेने व्याकुळ झालें ह्मणजे कोंड्याचे अन्न मांड्याप्रमाणे लागते; तान्हेनें जीव सुकला ह्मणजे उदकही अमृताप्रमाणे लागतं. ह्या गोष्टी अनुभवसिद्ध असल्यामुळे, आजच्या आनंदाचे माहात्म्य विशेष आहे हे उघडच होतें.' इत्यादि प्रस्ताव करून नंतर टिळकांच्या चरित्रास सुरवात झाली. बालपण व विद्या; एल्. एल. बी ची परीक्षा व नामदारपदाची प्राप्ती; त्याचा लेखनशैली व ओरियान: पुण्यांतील विद्वन्मंडल व त्यांची निस्पृहता; न्यू इंग्लिशस्कुलचा जन्म व शिक्षणपद्धति; केसरीमराठ्यांचे जन्म व बाणदारपणा; त्यांजवर आलेली संकटे व निराकरण; कन्सेंटबिल व त्यांत टिळकांनी केलेले परिश्रमः प्लेगचें भयंकर खरूप व त्यांत टिळकांनी सोसलेले कष्ट, व केलेले परोपकारः ज्युबिलीचा महोत्सव व त्याच रात्री झालेले अघोर कृत्यः टाइम्स ऑफ इंडियाचे विधान, व जास्टसच न नुमोदन; सरकारची खप्पा मर्जी व संशय. _मन संशयग्रस्त झाले झणजे अंतःकरणाची स्थिति कशी होते, ह्यावर ज्ञानेश्वरीचे दृष्टांत: नामदारांचा प्रतिबंध, व मित्रांचे प्रयत्न; टिळकाचा चौकशी व धैर्य: त्यांची शिक्षा व जनांचे दुःख; कारागृहातील उद्योग व वेदाध्ययन; तुरुंगाचे भाग्य व फायदे; सर्व यत्नांची निराशा व मोक्षमुल्लरासारख्यांची कळकळ; खुनी मनुष्याचा शोध व सरकारची संशयनिवृत्ति; टिळकांची आकस्मिक सुटका व सर्वत्र झालेला आनंदोत्सव. - इत्यादि विषयांचे सुमारे अडीच तास भाषण झाले. सर्व लोक एकाग्रचित्ताने ऐकत होते, व प्रेमभराने डुलत होते. सरतेशेवटी दयाळु चक्रवर्तिनी महाराणीसाहेबांच्या नांवाने व नामदार टिळकांच्या नांवाने जयघोष करीत, टाळ्यांच्या गजरांत भाषणाची समाप्ति झाली. नंतर रा. विष्णु कृष्ण आठल्ये, ह्यांनी विषयास अनुसरून थोडेसें भाषण केले व, खतः रचलेल्या कविता मटल्या. त्याही टाळ्यांच्या गजराने मानवल्याचे सर्वांनी प्रदर्शित केले. ह्या कवितांस दुसरीकडे स्थळ दिले आहे. त्यावरून त्यांची रचना वाचकांस कळून येईल. नंतर रा. रा. एस्. के. आठल्ये, फर्स्ट असि० श्री बाळाजी हाय