या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १० वा. अक्टोबर १८९८. 12 पुस्तकपरीक्षा. पंचवटीस्थलनिर्णय. मागील अंकावरून पुढे चाल. पण तेंच श्रीमंतांकडे वळा ह्मणजे सरलता, निरभिमानपणा, आणि सत्याची जिज्ञासा हे गुण कसे मूर्तिमंत पुढे उभे राहतात. " तथापि स्वमताचा दुराग्रह न धरितां तत्त्वबुभुत्सूनें, त्यांतून चांगल्या गृहस्थांशी शंकासमाधानस्वरूपानें वाद केला असतां वरील नियमाचे उल्लंघन केल्याचा दोष येईल असे वाटत नाही." " आह्मी तर तसे झणणाऱ्यांच्या मतास अशोधकांचे मत मटले आहे. ते प्राचीन असोत किंवा अर्वाचीन असोत. 'पुराणमित्येव न साधु सर्व' इत्यादि वाक्ये माहित असूनही भलतेंच विधान आहीं केलें तर मोठाच प्रमाद होईल. आतां येवढेच सांगतों की, जुन्या किंवा नव्या अशा कोणत्याही वर्गास अनुलक्षून आमी लिहिले नाही." तसेंच 'भूगोलाचा विशेषसा परिचय नसल्यामुळे' हे वाक्य धडधडीत वरच असतां श्रीमंत ह्मणतात: "आझी खरोखर सांगतों की, तसा एकही शब्द आह्मांस आढळला नाही. मग माफी करावयाची कसली? आमीही तसेंच सचवितों की, ओकांनी आझांसही क्षमा केलीच पाहिजे." 7 इत्यादि वाक्यांवरून श्रीमंतांची सरलता, निरभिमानपणा, व सत्यजिज्ञासा कशी आहे हे वाचकांस सहज दिसून येईल व तेही त्यांचा धन्यवाद गाइल्यावांचून राहणार नाहीत. शिवाय, नकाशासंबंधाने झालेली एक चक बिनतक्रार आपणहूनच त्यांनी पदरांत घेतली आहे. तशीच ओकांची झालेली त्यांच्या पदरांत टाकली आहे. ह्यावरून सदरहू वाग्युद्धांत धर्मन्यायाने व अविकृत अंतःकरणाने युद्ध केलें असें श्रीमंत बापूसाहेबांनीच. तेव्हां 'यतो धर्मस्ततो जयः' ह्या न्यायाने विजयश्रीने त्यांसच माळ घातली ह्यांत नवल नाही. ओक ह्यांस अशा प्रकारे सत्यासत्यनिर्णयाचे वाद आपल्या देशांत सुरू व्हावेत, अशी दृढः तर इच्छा होती, व त्यांनी निबंधमालेपासून कित्ता घालून दिला होता. त्याची चीज श्रीमंतांनी करून दाखविली. 'रामायणाची उत्पत्ति कधीं ? 'भारताचा