या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. स्कूल, ह्यांनी लिहून आणलेल्या इंग्रजी निबंधाचे वाचन व्हावयाचे होते. परंतु तो निबंध बराच विस्तृत असल्याने, व सभेमध्ये इंग्रजी भाषाभिज्ञ मंडळी फारच थोडी असल्याने अध्यक्षांनी तो बेत पुढे केव्हां तरी करावा हे बरे असे सांगितले. व त्यास सर्व सभासदांनी अनुमति दिली. नंतर संस्कृत, गुजराथी, हिंदुस्थानी, मराठी भाषावेत्ते दामोदरशास्त्री या नांवाचे गुर्जर गृहस्थ उठले, व त्यांनी हिंदुस्थानी भाषेत टिळकांचें चरित्र, गुण व दुर्धर प्रसंग यांचे वर्णन केले. श्रीबालाजीचे कारभारी नरशिंगप्रभु ह्यांनी मलबारी भाषेमध्ये थोडक्यांत टिळकांची मलबारी बंधूंस ओळख करून दिली. बाळकृष्णशास्त्री गोरे, विनायकशास्त्री गोरे, शिवराम कृष्ण थत्ते, वगैरे मंडळींनीही समयास उत्तेजनपर अशी मराठीमध्ये भाषणे केली. डाक्टर अप्पाराव श्रीबालाजीच्या हायस्कुलाचे म्यानेजर ह्यांनी टिळकांच्या चरित्रापासून कोणतें शिक्षण घेण्यासारखें आहे, ते इंग्रजीत अतिशय गंभीर व अस्खलित भाषेने सांगितले. नंतर पुन्हा कोकिळाने रचलेला पोवाडा व कांही कविता ह्मणण्यांत आल्या. - अशा प्रकारे सर्व भाषणे संपल्यानंतर अध्यक्षसाहेब बोलावयास उठले. तेव्हां मोठ्या उल्हासाने टाळ्यांचा गजर झाला. थोडक्यांत पण समयास शोभेल असें चटकदार अध्यक्ष ह्यांचे भाषण झाले. त्यांत टिळकांनी केलेली लोकसेवा, व तिच्याबद्दल बहुत सांगून 'टाइम्स'च्या खभावाचे वर्णन मोठ्या मजेनें केले होते. तेव्हां पुन्हां टाळ्यांचा गजर झाला. नंतर सभेची हकीकतं पुणे व मुंबईच्या दहा बारा वर्तमानकल्स कळविण्यासाठी तारेचा मसुदा तयार केला होता तो सर्वीस वाचून दाखवून सर्वांच्या पसंतीने ते काम सेक्रेटरींकडे सोपविण्यांत आले; व नामदारच्या मूर्तीपुढे ठेवलेल्या तबकांत ठेवलेले पेढे, पोष्टांतून त्यांस अर्पण करण्याचा, व एक अभिनंदनपर पत्र पाठविण्याचा ठराव केला. तसेंच उदयीक सायंकाळी चार वाजतां घेलाशेटींच्या बंगल्यांत 'केरळकोकिळ 'चें कीर्तन होईल, त्यास सर्वत्रांनी आप्तइष्टांसह येण्याची कृपा करावी अशी विनंती करून चक्रवर्तिनी महाराणीसाहे १ हा निबंध फार वाचनीय आहे. त्यांत नामदार टिळकांच्या मतांचे विवेचन फारच मार्मिकतेने केले आहे. हा निबंध 'मराठ्या'सारख्या पत्रांत छापून प्रसिद्ध होईल तर पुष्कळ उपयोग होण्यासारखा आहे.