या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०२. केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. बांच्या व नामदार टिळकांच्या जयघोषांत सभा विसर्जन केली. त्या वेळी पुन्हां खोदन्यांची सरबत्ति, वायें, व टाळ्या ह्यांचा एकच गजर उडाला. नंतर, पेढे, पुष्पं, पुष्पगुच्छ, हार, तुरे, अत्तरगुलाब, पानसुपारी यच्चयावत् सवीस वांटून आनंदाच्या भरांत सर्व लोक आपआपल्या घरी गेले. पेढे हा पदार्थ मलबारामध्ये आजपर्यंत ठाऊकच नव्हता मटलें तरी चालेल. त्याची ही कोचीत नवीच टूम! ह्याच दिवशी रात्री अमरावतींत श्रीहनुमंताच्या देवालयांत रुद्राभिषेक, दीपोत्सव, आरती धुपारती, व नृत्यगायन होऊन आनंदीआनंद करण्यांत आला. - तिसरा दिवस-सोमवार. सायंकाळी चार वाजतां घेलाशेटींच्या बंगल्यांत कीर्तनाची तयारी झाली. चटया, सतरंजा, गालिचे, तक्ये, लोडे वगैरे बिछायती घालून कीर्तनास योग्य अशी बैठक घातली होती. मोठमोठ्या समया लावून रोपनाई करण्यांत आली होती. मध्यभागी नामदारांची तसबीर ठेवून तीस हार, तुरे, पुष्पं वाहिली होती. उदबत्त्या, चंदन वगैरे साहित्यही जवळ होते. कीर्तनाच्या पाठीमागें साथ करण्यास सूत्रधारबुवा,-सीताराम रत्नाकर जोशी, सखाराम विष्णु फाटक, गोपाळराव जोशी, व गोविंदा सारंगीवाला हे आपआपली आयुधे घेऊन तयार होते. नाहीतर कोकिळ हा नावचाच. त्याची गायनकलेत प्रवीणता ह्मणजे बहतेक वडिल घ. राण्याइतकीच! पण अशा प्रसंगी वरच्या सारखी गुणी मंडळी मनोभावे साह्य करतात-सांभाळून घेतात-ह्याबद्दल कोकिळ त्यांचा खरोखरच फार उपकारी आहे. असो. कोचीच तहशीलदार व त्यांचे वडील; भाऊसाहेब गांवसकर, सखाराम बापू गावसकर, धारशीशेट, विष्णुशेट सांपळे, पंडित व त्यांचे मंडळ, विनायकशास्त्री, व शेवडे मंडळी, देवजी भीमजींचे म्यानेजर गणपतसिंग, दामोदर शास्त्री, व आणखीही कितीएक शेट सावकार इत्यादि लोक मोठ्या उत्सुकतेनें कीर्तनश्रवणास आले होते. मंडळी जमल्यानंतर कीर्तनास सुरवात झाली. 'हिरा ठेवितां ऐरणीवांचे मारितां जो घणी' हा मूळ अभंग