या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. २०३ होता. ह्यावर साधूची लक्षणे कोणती ? मंबाजीबुवानें तुकारामाचा छळ केला; ब्राह्मणांनी ज्ञानेश्वराचा छळ केला; त्यांतून ते कसे पार पडले. साक्रेटिसाची मनोरम कथा, अनुपम शांति व धैर्य; लेडी जेन ग्रेची हृदयद्रावक गोष्ट, स्वधर्माभिमान व दृढतर निश्चय इत्यादि पूर्वरंग झाल्यानंतर टिळकांच्या चरित्रास सुरवात झाली. आरंभ साकी वृत्त; बाल्यदशा व विद्यार्जन, आर्याछंद; पुण्यांतील प्लेगचा गहजब, सर्चपार्टी, टिळकांचा परोपकारीपणा, दिंड्या; टिळकांस पकडणे, कारागृहांत नेणे, पोषाख बदलणे, कामदावृत्त; इत्यादि निरनिराळ्या रसांस निरनिराळी अनुकूल अशी पवें योजलेली होती. ती सर्व देण्यास येथें सवड नाही. तथापि ज्याने श्रोत्यांचा प्रेमसागर उचंबळलेला दिसला, तेवढे पद येथे आमच्या वाचकांस सादर केल्यावांचून आमच्याने पुढे जाववत नाही. तें पद हैं:टिळकदर्शनासि चला, लाभ हा भला । उक्त राजभक्त ह्मणुनि मुक्त जाहला ॥ध्रु०॥ कीर्ति जशी रम्य तशी मूर्ति गोजिरी । सद्गुणमणिहार फार शोसला ॥ १ ॥ टिळकदर्श० सुमनयुक्त सुमनतुल्य, मृदुलभाषणीं । पहावया महानुभावजीव लोभला ॥ २ ॥ टिळक० खष्ट नष्ट परम दुष्ट तुष्टती जया । गोड असा कष्ट करुनि रोड जाहला ॥ ३ ॥ टिळक सक्तमजुरि करुनि रक्त आटवी किती। ठरुनि राजभक्त परी मुक्त जाहला ॥ ५ ॥ टिळक० स्तवन कवन सुखद भवन, पठण करित दुरितशमन । स्मरुनि टिळक करुनि नमन, कृष्ण राहिला ॥५॥ टिळक० अशा प्रकारें आनंदाच्या भरांत महाराणीसाहेबांच्या व टिळकांच्या नामोच्चारगजरांत आरती वगैरे होऊन कीर्तन आटोपलें. नंतर दामोदरशास्त्री यांनी गुजराथी भाषेत टिळकांचे चरित्र समजून दिले, त्यांचे गुण आंगी आणण्याविषयी सर्वांस उपदेश केला, व कीर्तनांतील पद्यांची त्यांनी फारच प्रशंसा केली. त्यांची जडणी, अनुप्रास