या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. व अर्थलाघव ही अतिशयच उत्कृष्ट साधली आहेत असे ते ह्मणाले; व त्याचे गुजराथी भाषांतर करून प्रसिद्ध करण्यासाठी त्यांनी ती मागून घेतली. नंतर विनायकशास्त्री गोरे ह्यांनी शुद्ध, अस्खलित असे गुजराथी भाषण करून टिळकांची ओळख करून दिली, व गुजराथी लोकांनी व महाराष्ट्रीयांनी असेंच एकदिलाने नेहमी जमा झणजे अनेक फायदे होतील असे सांगितले. नंतर दुसरे दिवशी आपआपले घरी शक्त्यनुसार दीपोत्सव करण्याचा ठराव करून तो समारंभ समाप्त झाला. - ह्याच रात्री कोचीच्या उत्तरेस बायपी नांवाचें बेट आहे. तेथील श्रीमाल्लकार्जुनाच्या देवालयांत दीपोत्सव, खिरापत वगैरे समारंभ कुणबी लोकानी केला! आणि हे कुणबी झणजे मलबारांतील होत, ही गोष्ट विसरता कामा नये! चवथा दिवस-मंगळवार. ह्या रात्री कोचीच्या मंटचेरी नांवाच्या बाजारांत फारच प्रेक्षणीय थाट झाला. केवळ प्रतिदिवाळी दिसत होती. बहुतेक दुकानांपुढे केळी उभ्या केल्या होत्या, व तोरणे बांधली होती. ठिकठिकाणी हंड्या, झुंबर, दिव वगरे लावून चकचकाट केलेला दिसत होता. सांपळ्यांच्या वखारात पणत्यांच्या रांगाच्या रांगा लागल्या होत्या. शेवड्यांच्या वखारीतही तसाच थाट होता. धारशी शेटींच्या वखारीत झुंबर व ग्लास; गांवसकरांच्या वखारीत हंड्या; ह्याचप्रमाणे मूळजी जेठा, रायशीशेट, दामजी उखा, घेला नेनशी, माकाशेट, हरजीवन पाच्छा, धनजीरोट, हंसराज, देव्हरचंद, दादाशेट आरवारी, वगैरे तमाम लोकांनी रोषनाई कला हाता. इतर छोट्या दकानदारांनीही शक्त्यनसार कांहींना काही केलं होतच. दिपवाळीतील लक्ष्मीपूजनाप्रमाणे मोठमोठाले सभ्यगृहस्थ सात वाजल्यावासून प्रत्येक पेढीवर पानसुपारी घेत फिरत होते. प्रत्येक पेढीवर टिळकांची तसबीर, तिची पजा, व त्यांचे गुणानुवाद हे असावयाचेच. ह्याशिवाय कोणी केळी, कोणी खडीसाखर, कोणी द्राक्ष, कोणी चहा, कोणी काफी, कोणी फलें, कोणी हार हे वांटीतच होत. ह्याप्रमाण ठिकाठकाणची पानसुपारी, अत्तरगलाब, हारतुरे घेत घेत व आरास पहात पहात मंडळीला घरी यावयास ते दिवशी बारा वाजले !