या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. २०५ ह्याप्रमाणे कोचीतील मंडळींनी एकदिलाने व हौसेने हा आनंदोत्सव साजरा केला, ह्याबद्दल सर्वांचे आभार मानणें अवश्य आहे. त्यांतूनही विशेषतः रा. रा. बाळकृष्ण अनंत गोरे ह्यांचे विशेष आभार मानले पाहिजेत. कारण, अथपासून तों इतिपर्यंत त्यांचे श्रम अगदी अश्रांत होते. आणि त्याचेच हे सर्व फळ होय. असो. नामदार टिळक ह्यांच्या अति दूरस्थ थोड्याशा देशबंधूंनी यथाशक्त्या यथामत्या हा आनंदोत्सव सादर केला आहे. त्याने नामदारांच्या दुःखाच्या विस्मृतीत किंचिन्मात्र तरी भर पडो येवढीच इच्छा आहे. आतां सरतेशेवटी ह्या आनंदोत्सवाचा ज्या दयावंत सरकारच्या कृपेने योग घडून आला, त्या सरकारचे राज्य आह्मांवर चिरस्थायी होऊन त्याची बोलबलाय व्हावी, व नामदार टिळकांस लोकसेवा करण्यास उत्तरोत्तर अधिक सामर्थ्य यावें, येवढें जगदीशापाशी मागणे मागून, कीर्तनांतीलच शेवटच्या आर्येने हा लेख आमचे अप्रतिम लोकप्रिय मित्र नामदार बाळ गंगाधर टिळक ह्यांस समर्पण करतो. - आर्या. सद्गुरु आपण अमुचे शिष्यत्वाचेंचि सर्वदां नाते । घ्यावी स्वभक्तसेवा सेवी रवि जैवि अर्घ्यदानातें ॥ १ ॥ आनंदोत्सव अथवा आमचे कट्टे स्वदेशाभिमानी व परम देशहितैषी नामदार टिळक ह्यांची कारागृहवासांतून सुटका. श्लोक. बांधी सुंदर धैर्यकंकण करी, लोकांस दावी धडा सत्याचा दृढनिश्चयें उचलिला, ज्याने सुखाने विडा । १ ही उपमा दूरत्वसंशयनिरसनार्थ आहे. हिच्यावर कीर्तनांत बरीच मौज केलेली होती.