या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. २०७ सोन्याचा दिन आज हा, उगवला दाही दिशा फांकल्या झाल्या ज्या लपल्या तमांत घन त्या, आनंदराशी खुल्या । प्रेमोद्गारजलें, तुडुंब भरले, जे हृत्स्वरूपी सर ने वाहे फोडुनि पाट तें खळखळां, काढोनि मंजुस्वर ॥ ७ ॥ लोकांचा जयघोष सर्व घुमला, ह्या आर्यभूमीवरी वांटी साखर कोण हारगजरे, कोणी मिठाई बरी । दीपोत्साह, अरास, मंगल उभे केलें गुढ्या तोरण आनंदोत्सव गाजला प्रति दुजा, दीपावळीचा सण ॥ ८ ॥ त्या मानास भला खरोखर दिसे, हा पात्र आहे बरें कांहीं वर्तन साधुतुल्य जगतीं, केलें खरें हो खरें । आह्मी सर्वहि ‘धन्य धन्य' ह्मणुनी, त्याचा करूं गौरव आनंदें जयघोषसूचक सदा, काढूं मुखाने रव ॥९॥ जो का शुद्ध सुरेख लेखनपटू, जो दिव्य विद्वन्मणी यद्वाणी रमणीय होय सकलां, वाग्देवतेची खनी । लोकांचें, अपुल्या निरंतर मनी, कल्याण जो इच्छितो अश्रांत श्रम घेइ लोकविषमी, साधू महा धन्य तो ॥ १० ॥ येतां दुर्धर संकटें तनुवरी, सोशी स्वदेशास्तव त्याचा गर्जुनियां त्रिवार न कसा, लोकांत व्हावा स्तव । होती थोर जगद्धितार्थ, जगतीं, साधू विभूती भल्या कां हो धन्य ह्मणूं नये, मग तसा, हा मोहरा लाभल्या ॥ ११॥ असे थोर सिद्धांत हा माणसाला महा संकटें लाविती की कशाला । हिरा कोणता, कोणती गारगोटी कळे तें विभूती खरी आणि खोटी ॥ १२ ॥ आरंभी संकटाच्या, अति कठिण जया शेवटी तोहि साच आला की योग सारा, झरर जुळुनियां मंगलाचा तसाच ।