या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. त्याला साधू ह्मणोनी, तरि सकल जनीं, कां न सांगा गणावें आनंदोद्गारघोषं, गजर करुनियां, धन्य त्याला ह्मणावें ॥ १३ ॥ निजजनपदसेवा, आणखीही घडावी बाट सुयशशशिकलाही, तत्कराने चढावी । त्रिभुवनपति, देवो, त्यांस कार्यात सिद्धी सकलसुखसमृद्धी, आयुरारोग्यवृद्धी ॥ १४ ॥ उसळत लहरीने थोर आनंदसिंधु कवनकुसुमवृष्टी, त्यांत हा अल्पबिंदु । विबुधजन कृतीची, आवडी या करोत सविनय विनती ही, बालकाची वरोत ॥ १५ ॥ कीर्तनाच्या शेवटीं जयजयकारास्तव केलेलें. पद. ('माझा कृष्ण देखिला काय' ह्या चालीवर.) आह्मी टिळक गाउं या आज । सारे प्रेमभरें ॥ ध्रु० ॥ मंगलमूर्ती मंगलधाम । त्रिभुवनिं गाजे ज्याचें नाम । निरंतर देशहिताचे काम । क्षण विश्राम ज्यास नसे ॥ आमी० ॥ केवल भारतिचा जो बाल । प्रेमल विघ्नहराचा लाल । त्याचा भाग्यशशीचा काल । तुह्मी सजवाल काय ह्मणूं ॥ आमी० ॥ हातीं घेउनि टाळ मृदंग । नाचूं रंगणिं होउनि दंग । प्रेम तद्गुण गाउं अभंग । गुंगत भुंग यशकमलीं ॥ आमी० ॥ 'टिळक' सुमंगल गांवोगांव । जयजय शब्दें गर्जू नांव । देवो सिद्धि गजाननराव । निर्मळ भाव पाहोनी ॥ आमी० ॥ धनसंतति आयुर्दाय । वाढो क्षेमसुखाचा ठाय । त्याचा राहु निरोगी काय । करो गणराय मंगल की ॥ आह्मी० ॥ विनवी कृष्णतनय हा फार । ऐका सभ्य सभ्य सरदार । बोला 'टिळक टिळक' जयकार । गजर त्रिवार सर्व करा ॥ आह्मी टिळक गाउं या आज । सारे प्रेमभरें ॥ ध्रु० ॥