या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. २०९ पुस्तकपरीक्षा. पंचवटीस्थलनिर्णय. _मागील अंकावरून पुढे चालू. । युद्धांतील गोष्टही तशीच. जय किंवा विजय प्राप्त होणे, हे काही अंशी सेनेवर, काही अंशी धैर्यावर व काही अंशी प्रारब्धावर अवलंबून असते. परंतु धर्मयुद्ध कोणी केलें ? ह्याकडे लोकांचे लक्ष फार वेधलेले असते. त्याचप्रमाणे वाग्युद्धांतही या गोष्टीचा विचार करणे आवश्यक दिसते. ह्मणून ह्या वादांतही अधिक सरलता, सत्य समजण्याचीच इच्छा कोणाची आहे ? पक्षाभिमान कोणामध्ये अधिक दिसून येतो? आपली विद्वत्ता दाखविण्यांत व कोटिक्रम लढविण्यांतच कोणास भूषण वाटते? ह्याचाच विचार करूं या. कै. ओक हे जाडे विद्वान् ; अचाट उद्योगी; अत्यंत विद्याव्यसनी; अप्रतिम रसिक; भले शोधक होते हे सर्वमान्यच आहे. परंतु त्यांच्या लेखांत-अर्थात-स्वभावांतही-दोन गोमी स्पष्ट दिसून येतात. पहिली ही की लार्ड बेकनने झटल्याप्रमाणे 'कित्येकांस सत्य समजून घेण्यापेक्षा आपली विद्वत्ता दाखविण्यांत आणि कोटिक्रम लढविण्यांतच विशेष भूषण वाटते.' तसाच प्रकार ओकांमध्ये बऱ्याच अंशाने दिसून येतो. आणि दुसरी अर्वाचीन शोधकांकडे दृढतर ओढा. हे आमचे विघान ऐकून कित्येक वाचक आह्मांवर रुष्ट होतील; कित्येकांस त्याचा अचंबा वाटेल; व किती एक साशंक मुद्रेने पाहतील. पण ह्या गोष्टी सिद्ध करावयाला फारसे प्रयास नकोत. पहिलीला 'काव्यसंग्रह ' मासिकपुस्तक हेच उत्कृष्ट साक्ष आहे. त्याचे स्वरूप कसकसे बदलत गेलें ह्याकडे थोडीशी नजर फेंकली हणजे हे कार्य सहज होईल. | महाराष्ट्र कवितांचे आद्य मासिकपुस्तक 'सर्वसंग्रह' हे होय. ह्यांतील कवितांवर प्रसिद्ध रसिकवर्य परशुरामपंत तात्या गोडबोले, हे टीपा देत असत. त्यांत कठीण शब्दांचे अर्थ, दूरान्वय वगैरे असल्यास तो, क्वचित्स्थळी समजून सांगण्यासारखा अर्थ असेल तो, द्यावयाचा इतकाच त्यांचा परिपाठ होता. त्यानंतर प्रस्तुतचा 'काव्यसंग्रह' कै० जनार्दन बाळाजी मोडक ह्यांनी सुरू केला. त्यांचेही टीपा देण्याचे धोरण परशुरामपंत तात्यांसारखेंच, परंतु काही अधिक होतें.. हे फक्त शब्दाचे अर्थ, पाठभेद, विशिष्ट नामांची फोड, ह्याच्या पलीकडे अगदीं पाऊल ठेवीत