या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१० केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. नसत. तरी, ह्याहून किंचित् अधिक माहिती असावी, असे सर्वांस वाटत असे. दुर्दै. वाने थोडक्याच महिन्यांत मोडकांवर काळाची झडप पडली. तेव्हां आतां त्यांच्या तोडीचा गृहस्थ तेच काम पुढे रेटण्यास कोण मिळतो, ह्याची पुष्कळांस जिज्ञासा उत्पन्न झाली. परंतु योग्य कामावर योग्य मनुष्याची निवड करणे, हेच कायतें 'निर्णयसागर' चे प्रधान कौशल्य आहे. त्याने हंसचंचुवत् अचानक त्या कामावर ओकांची योजना केली. ओक हे आधी जात्याच हुशार; आणि त्यांत काव्यसंग्रहासारखें जोखमाचे काम त्यांच्या गळ्यांत पडले. तेव्हां मोडकांच्या मृत्यूने झालेली हानी, व पडलेली उणीव भरून काढली पाहिजे, येवढेच नव्हे, तर त्यांच्या पश्चात् काव्यसंग्रहाचा लौकिक अधिक वाढविला पाहिजे, अशी ईर्ष्या त्यांच्या अंगी उद्भवणे साहजिकच आहे; व त्याच उत्सुकतेने त्याना आपले काम मोठ्या नेटाने व उत्साहाने चालविले, त्यांच्या टीपांमध्ये शब्दाच्या टीपा विस्तृत असून कोठें रूप, कोठे श्लेषचमत्कार, अलंकार, इत्यादि येऊ लागले. ते सर्व लोकांस अतिशय पसंत पडले व मोडकांच्या टोपाहूनही ओकांच्या टीपा फार आवडल्या. तेव्हां शेकडों लोकांकडून त्यांस अभिनंदनपर व उत्तेजनपर पत्रे येऊ लागली. त्यांचा परिणाम खरोखर इष्ट व्हावा, परतु तसें न होतां भलताच झाला. टीपा होता होतील तितक्या विस्तृत देणे, दाखवितां येईल तितकी विद्वत्ता दाखविणे, घेववतील तितक्या ग्रंथांचे उतारे घेणे हेच आपले कर्तव्य असा ओकांच्या मनाचा ग्रह होत गेला. आणि त्या अनुरोधाने उगमाकड़न मुखाकडे नदीचा प्रवाह वाढत वाढत शेवटा समुद्रा व्हावा, त्याप्रमाणे स्थिति झाली. प्रथम शब्दांचे अर्थ एक एक देण्याची चाल होती, ते दोन दोन झाले. मग एकच वाक्य उलट सुलटे करून ओली भरल्या. नंतर उपमा, उत्प्रेक्षांस सुरवात झाली. त्यापुढे अलंकार, ते एकाच त-हेचे पुरेनात, तेव्हां इंग्रजी त-हेचे आणण्यास सुरवात झाली. त्यापुढे भारत, भागवत, अग्निपुराण, पद्मपुराण, इतर कवि ह्यांचे उतारे; मग ही उपमा आहे; हा अलंकार आहे; असें होता होतां अखेर 'लोकहितवादी' कृत इतिहासांतील पानेंच्या पानें खुशाल येऊन वामन मोरोपंतांच्या पंक्तीस बसू लागली! 'वामन पंडितकृत कवितासंग्रह, भाग पहिला' हे बांधीव पुस्तक हातांत घ्यावे, आणि पाने परतावयास लागावें, मणजे ह्याची प्रचीती तत्काल येते. ह्या पुस्तकांत ९६ पृष्ठापर्यंत मोडकांच्या टीपा आहेत व पुढे ओकांच्या आहेत. मोडकांच्या टीपा १ ओळ, दोन ओळी, कचित् ठिकाणी ४५ ओळींपर्यंत गेल्या आहेत.