या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३८ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. काल कोणता?' हे वाद विलायतेंतील लोक नेहेमी मोठ्या कडाक्याने करित असतात. अशा वादकल्स प्रसिद्ध मोक्षमुल्लर साहेबांनी एकदां उत्तर दिले होतें की " हे वाद तुह्मी हिंदुस्थानांतील जुन्या पंडितांशी करा; झणजे तुमचा पोकळपणा किती आहे तो तुझांस कळून येईल." त्याचीही श्रीमंतांनी सार्थकता केली. हा श्रीमंतांचा विजयध्वज सदासार्वकाल फडकत राहील व त्यास रतिमात्र मागें सारणाराही कोणी मिळणार नाही. पण हे आझांस सांगण्यास व श्रीमंतांस ऐकण्यास आनंदोत्सुकता नाही हे उघडच आहे. कारण, आमचे उभयतांचेही सन्मान्य मित्र विद्वद्वर्य ओक हे हयात नाहीत! हे मनांत आले ह्मणजे वारंवार दुःखाने व प्रेमाने गळा दाटून येतो, अश्रृंनी डोळे भरून जातात! ह्यास्तव ह्या सुखदुःखमिश्रित पुराणाची नाडी येथेच बांधून पोथी गुंडाळतो. . विस्तार फार झाला खरा, तरी एका गोष्टीचा उल्लेख केल्यावांचून आमच्याने लखण खाली ठेववत नाही. ती गोष्ट झणजे प्रस्तुत पुस्तक में "पंचवटीस्थलनिर्णय" त्याच्या छपाईसंबंधाची. पस्तकाची छपाई कांही इतकी नांवें ठेवण्यासारखी नाही. पण अशुद्धांसंबंधाने जी काही दशा आहे ती विचारूं नये. विरामांना ठिकाण नाही; प्यारेग्राफांचा पत्ता नाही; हे तर काय पण 'र' च्या ठिकाणी 'च', 'ड' च्या ठिकाणी पर. कोठे अधिकच अक्षरें, कोठे मुळीच नाहीत, असा जो सांवळा गोंधळ झाला आहे. त्यामुळे पुस्तक धडपी वाचतां सुद्धा यत नाही. श्रीमंतांनी टयटर साहेबांचे व खासगी कारभाज्यांचे आभार मानले आहेत, त्यांनी एकवार सुद्धां बकावर नजर टाकू नये काय ? ह्या दुर्लक्षामुळे ह्या सुंदर पुस्तकाचे अगदीच मातेने होऊन गेले आहे. ह्याचा श्रीमंत काही तरा विचार करतील अशी आशा आहे. तरी सदरह पुस्तक अतिशय महत्त्वाचे असल्यामुळे जिज्ञासु, रसिक व शोधक लोकांनी त्याचा अवश्य आदर करावा येवढी मनःपूर्वक सूचना करून कलम खाली ठेवतो. पत्रव्यवहार. मग रा. केरळकोकिळकर्ते यांस: झांशी, एन्, डब्ल्यू, पी. प्रियमहाराज, २२ अक्टोबर. ९८ __मला मराठी लिहिता येत नाही. ह्यास्तव माझें मणणे आपणास मला ईजालीतच कळविणे भाग आहे. आपले लेख मला फारच पसंत आहेत. आ