या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. २११ ओकांनी उगमापाशी मोडकांचाच क्रम धरलेला आहे. ९७ पानावरील टीप अवघी २ ओळीची आहे. परंतु तो प्रवाह वाढण्यास सुरवात झाली. १५७ पा. नांत १२ ओळी झाल्या; १८७ पान १३, १९१ पान २२; ४९७ पान २५, ह्याप्रमाणे हा प्रवाह उत्तरोत्तर दांडगा होत चालला. ज्या मोरोपंताच्या आर्या एका पेजांत निदान १२ तरी व्हावयाच्या त्या सरासरी १।२।३ फार ५ किंवा ६ झाल्यास पराकाष्ठा होऊ लागली. पण ह्यामुळे सहा वर्षांत भारत संपावयाचें त्याची वर्षे १२ झाली, हे काही ओकांच्या लक्षात राहिले नाही. कित्येकांनी त्यांस अन्योक्तीने सुचवून पाहिले; कित्येकांनी कुरकूर करून पाहिले; व कित्येकांनी तर 'हे तुमचे मारुतीचे शेपूट आतां अंमळ आवरून ध्या' असे स्पष्टपणे झणण्यासही कमी केलें नाहीं ! पण ओकांनी कोणासही मीठ घातले नाही. 'आपल्या विरुद्धही पुष्कळ लोकांच्या तक्रारी आहेत' येवढी झ्याकी मात्र उडवून दिली. ही कुरकूर श्री. बापूसाहेबांच्या कानापर्यंतही गेली होती; व त्यावर श्रीमंतांनी "बुभुक्षितः किं द्वि करेण भुक्ते' हे समाधान सांगितले आहे. परंतु बायजाबाईंच्या समाराधनेप्रमाणे भुकेने कळवळलेल्या ब्राह्मणांपुढें पाने मांडून गार पाणी, पाट, रांगोळ्या, पंखे, धूप, दीप, ह्याखालींच सायंकाळचे चार वाजवून मग मीठ यावयाला दोन घटका; मेतकूट यावयाला चार घटका अस होत होत, रात्रीचें दीपदर्शन झाले तरी भाताच्या मुदीला जर ठिकाण नाहीं तर, त्या जेवणारांनी काय करावे ? पोटाचे अगत्य असेल तर पान सोडून घरी जावें, रुपया दक्षणेचे अगत्य असेल तर प्रारब्धावर हवाला ठेवून बसावें, दुसरा मार्ग नाही ! असा हा टीपारूप ओकांचा प्रवाह ओढे, नाले जमा करीत करीत फोपावून अखेर भागीरथी जशी सुंदरीबनावर भडकून कोठे जावें व कोठे न जावें असें होऊन हजारों फांट्यांनी समुद्रमय झाली, त्याप्रमाणे हाही प्रवाह एकदांचा 'केकावली' वर जाऊन आदळला, आणि त्या विचारीला अगदी पुरे पुरे करून सोडलें! केकावली ही मयूरपंतांसारख्या कुलवंताची कन्या, तिचे रूप आणि गुण केवळ अप्रतिम, आणि अलंकारांचे सारे भांडार ओकांच्या हातांत, मग काय ? साधारण श्रीमंतांच्या बायकांस सुद्धां दोन दोन जोड, तीन तीन जोड अलंकारांचे असतात. हिन्यांचे निराळे, मोत्यांचे निराळे; जडावाचे निराळे, त्याप्रमाणे हे आमचे ओक तरी कां कमी करतात ? त्यांनीही तिच्या नाकाला, कानाला, हाताला, पायाला, गालाला, भोंके पाड पाडून मराठी पद्धतीचे अलंकार काय,