या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. २१३ हांथरुणास खिळले असतील, व कोणी चाळशी येऊन वाचण्याच्या कामास निरुपयोगीही झाले असतील! आणि हाच क्रम पुढेही चालू राहिला, तर पुढील सात आठ वर्षांतही हीच गत होऊन, तेवढ्यात तरी दुर्योधन महाराजांचा कुलक्षय होईल किंवा नाही ह्याचा वानवाच ! आणखी निरनिराळे टीपाकार होऊन 'काव्य संग्रहाचे स्वरूप प्रौढपणांत कसे काय बदलेल तो भाग निराळाच. एका अंगावर मनुष्य जास्त नजर देऊ लागले, ह्मणजे दुसऱ्या अंगावरची नजर कमी होते, आणि अर्थातच तें ढिले पडते. महाराष्ट्र काव्यसंग्रहामध्ये वाचकांस कवितेचा अर्थ समजून देणे ही प्रधान गोष्ट; आणि त्यास होईल तितकें सहाय करणे येवढे टीपाकाराचे कर्तव्य, तें परशुरामपंत तात्या व मोडक पूर्णपणे जाणत. आणि ह्मणूनच आपला रस्ता सोडून कणसें जमा करण्याचे काम करीत नसत. त्यांना अलंकार समजत नव्हते, मूळ भारतादि ग्रंथांतले उतारे देता येत नव्हते, नामदेवाचे अभंग अवगत नव्हते, असे समजणे ही मोठी चूक होईल. ओकांचा समज अगदी भिन्न. टीपा होतील तितक्या विस्तृत करावयाच्या, त्यांत इंग्रजी, मराठी, संस्कृत ग्रंथ जितकें दडपवेल तितके ग्रंथ दडपून देऊन, आपल्या विद्वत्तेने व बहुश्रुतपणाने होईल तितकें लोकांस दिपवून सोडावयाचे, ह्यामुळे मूळ आर्येच्या अर्थाकडे त्यांचे बहुतेक दुर्लक्षच होतें झटले तरी चालेल. सर्व पर्चे त्यांस समाधानकारक लागली असतीलच असें झणणे बरेच जड जाईल. ह्यांजविषयी आमांस बरेंच लिहावयाचे असल्याबद्दल आह्मी आपला हेतु 'काव्यसंग्रहा' वर अभिप्राय देतांना व्यक्त केलेला आमच्या वाचकांसही आठवत असेलच. परंतु आमचा आळस असा मठ पडला की, ओक कैलासवासी झाले तरी त्याच्याने आपली जागा सोडवली नाही ! व आता तसें करीत बसण्याचे स्थळ नव्हे हे उघडच आहे. तथापि हा ओकांचा कित्ता पुढील टीपाकारांस सुद्धा मोठा बाधक झालेला आहे. कारण, 'यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तदेवेतरो जनः' ह्या न्यायाने त्यासच नव्या मनुष्याने मान देणे उक्त आहे. बरें; कदाचित् टीपा कमी कराव्यात असें त्याच्या मनांत असले तरी सुद्धा त्यास तसे करता येणार नाही. कारण, विस्तृत टीपांवर नजर बसली असल्यामुळे, त्या कमी होतांच "ओकांची विद्वत्ता केवढी, त्यांची परिचालनशक्ति काय, त्यांचे ग्रंथावलोकन किती! तें दुसऱ्याला काय साधतें ! महिना दोन महिने गेले नाहीत तों आलें संपुष्टांत !" असें ह्मणावयास