या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१४ केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. ही मंडळी कांहीं चुकावयाची नाही. तेव्हां पहिले नांव सांभाळून त्यावर छाप बसविण्याचा प्रयत्न करणे हे नव्या संपादकांस उक्तच आहे. ह्मणूनच हल्लींच्या संपादकांनाही 'ही आर्या उत्तम आहे; ही उपमा फारच उत्कृष्ट; हा शब्द योग्य नाहीं असें कोण ह्मणेल ?' इतकेच नव्हे तर 'ही उपमा आहे; हा दृष्टांत आहे; ही उत्प्रेक्षा आहे' इत्यादिकांनी पाने भरावी लागतात. पण अशी टीपांवरच झोड उठविण्याचे मनावर घेतल्यामुळे, मूळ पद्याकडे अगदीच दुर्लक्ष होत चालल आहे. येवढेच नव्हे, तर कितीएक पद्यं छिन्नविच्छिन्न होऊन त्यास विद्रूपता प्राप्त झाली आहे. हे पहावयासाठी विशेष मागे जावयास पाहिजे असेंही नाही. परवांचा ताजा 'महाराष्ट काव्यसंग्रह' चा ९० वा अंक पाहिला तरी पुरे. हा अंक येतांच सहज पाहावयासाठी ह्मणून उलगडला. तो द्रोणपाताल . १०० वी आया दृष्टीस पडली. ती हीः करिते झाले युद्ध क्रुद्ध शरभसिंह देवदानवसे;। मानवले, गमले न, स्नेहकणहि तन्मनी तदा न वसे ॥ १०॥ - ही आया जशी आमच्या पाठांतील आहे, तशीच ती बहुतेकांच्याही पाठांतली असेलच. तेव्हां 'मानवले' हा पाठ वाचून आह्मी अगदी भ्रमांत पडला. कारण, ज्याला ह्मणून किंचित् रसिकता आहे, ज्याला थोड्या बहुत कविता करण्याचा किंवा वाचण्याचा तरी नाद आहे, मोरोपंतांच्या आर्याशी ज्याचा याकिचित तरी परिचय आहे. त्याच्या सुद्धा ही गोष्ट सहज लक्ष्यात १२० तिसऱ्या चरणाचा आरंभ 'मानवसे गमले न' असाच असला पाहिजे. 'मानवले' ह्या शब्दाने त्या आर्येला कसा पेबळटपणा आला, व तिच्या गौरवाचा कसा सत्यनाश झाला हे तत्काल ध्यानांत येतें. प्रथमतः आमचा तके असा धावला की 'स' च्या ठिकाणी 'ल' चा टाइप चुकून पडला असावा. कंपाशिटरकडून अशी चूक होणे शक्य आहे. संपादकांकडून अशी भलतीच चूक होणे नाही. व तशी ती झाली असती. तर क्षम्य वर्गात ढकललीच पाहिजे. परंतु खाली पहातों तो 'मानवले' व 'गमले' ह्या शब्दांवर धडधडीत दिलेल्या टीपा ! जणों काय आपल्या हेळसांडीचा व अरसिकतेचा मूर्तिमंत साक्षीदारच ! झणून आमी मुद्दाम नवनीत पाहिले, तो त्यांत 'मानवसे' असाच पाठ. पुनपि संशय येऊन सर्वसंग्रहाची मूळ प्रत पाहिली, तो त्यांत तसेंच! तेव्हां ह्या नव्या संपादकांनी केली की नाही ओकांच्याही वर ताण ! तर हे कसे घडले असावें ?