या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ९ वा. सप्टेंबर १८९८. २१५ आमच्या मतें प्रथमतः मूळ प्रतीवरून कंपोझ करावयाला छापखान्यांत फर्माविलें, टाईपांच्या केसेमध्ये टाईपांचे डिस्ट्रिब्यूशन करतांना 'ल' च्या घरामध्ये 'स', 'स' च्या घरामध्ये 'ल' पुष्कळ वेळ पडत असतात. तेव्हां कंपोझ करतांना गुफामध्ये 'स' च्या ऐवजी 'ल' पडून प्रूफ संपादकांकडे गेले असावें. त्यांनी खरें झटले झणजे मूळ प्रत ताडून पहावयाची. परंतु तें काम आपले नव्हे; टीपा ल्याहावयाच्या येवढेच काम कायतें आपलें अशी समजूत त्यांच्या हाडी खिळलेली; तेव्हां कशाला येवढी तसदी घेतात ? मूळ आर्या पाठ नाही. अर्थाकडे लक्ष्य पुरवावयाचे स्वप्नांत नाही. तेव्हां उरलें काम काय ? तर शब्दार्थाच्या टीपा द्यावयाच्या. ते त्यांनी पट्कर करून सोडले. 'मानवलें' हणजे काय तर 'हृष्ट झालें !' पण 'गमलें' ह्याचे काय करावयाचें, ह्याची पडली पंचाईत. हे: ! पण त्यांत काय आहे ? 'खेळले नाहीत !!!' हाणून दिले ठोकून आणि झाले मोकळे न् काय ! एवंच एखाद्या लाडक्या मुलीचा एखादा हात पाय तोडून, किंवा डोळा फोडून किंवा नासिकाच्छेदन करून तिला नखशिखांत अलंकाराने मढवून काढण्याचाच हा प्रकार होय. हे मोठ्या दिलगिरीने ह्मणावे लागते. रा. रा. तुकाराम जावजी, ओक, व 'महाराष्ट्र काव्यसंग्रह' ह्यांचे आह्मां महाराष्ट्रीयांवर स्मरणीय व चिरंतनचे उपकार झालेले जसे खरे आहेत, तसाच वर सांगितलेला प्रकारही कांहीं खोटा नाही. आणि इतक्या सर्वांस कारण काय तर ओकांस स्तुतीने घातलेली मोहनी, व विद्वत्वदर्शनाची हौस. श्रीमंत बापूसाहेबांच्या पत्रोत्तरांतही हाच त्यांचा स्वभाव व्यक्त झाला आहे. स्वमतपुष्टयर्थ जे जे आधार लागतील, ती ती वाक्ये जेथल्या तेथे देऊन ती ती कोणत्या ग्रंथांतील आहेत, येवढे दर्शविले झणजे आपण किती परिश्रम केले, किती ग्रंथ चाळले हे लोकांस सहजच कळतें. ते सोडून ज्या ग्रंथांत जनस्थानासंबंधाचे एकही अक्षर नाही, असल्या भाराभर ग्रंथांची यादी प्रतिपक्षापुढे फेंकणे हे लक्षण कशाचें ? आणखी हा आक्षेप कोणी काढतील तर त्यावर पांघरूण घालण्यासाठी वर सांगावयाचें की 'काही मित्रांच्या सूचनेवरून !' छापून प्रसिद्ध होण्यापूर्वी सांगावयास येणारे जे मित्र ते कोण ? अर्थात् खासगी मंडळी! अशा यादीनेच जर आपला पक्ष खरा होत असता, तर एखाद्या 'सरस्वतीमंदिराचा' भला मोठा क्याटलाग पुढे केला असता तर त्याहून लवकर काम होते, आणि नासिकांतले राम पटकन जाऊन गोदावरीच्या मुखाकडे बसते !