या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १२ वें. दुसरी गोम झणजे दुराग्रह किंवा एका पक्षाचा फाजील अभिमान. हा दोष वादामध्ये अत्यंत विघातक होय. वादामध्ये सत्याकडे विशेष ओढा असावा लागतो. आणि त्याला पुरोपूर सरलता अंगी असली पाहिजे. परंतु ओकांची खालील वाक्यें पहा: - "ही टीप लिहिली तेव्हां बराचसा विचार केला असल्यामुळे:-" "अर्वाचीन शोधकांचाच पक्ष सबल व खरा आहे." " त्यांच्या पत्राच्या झोकावरून ते या अवार्चीन शोधकांस 'अशोधक' समजतात अस दिसते. परंतु प्रथम प्रकारच्या पुराव्यांतील ग्रंथकारापेक्षां हेच आझांस विशेष मान्य आहेत." ह्यावरून ओकांचा कल, प्रथमपासूनच 'अर्वाचीन शोधक' पक्षाकडे झुकला हाता ह सहज दिसून येईल, गौतमी माहात्म्याच्या १८ व्या अध्यायांत 'पंचवटी' च्या उपपत्तिसहवर्तमान साद्यंत कथा असता, त्यांत पंचवटीसंबंधाने एक अक्षर सुद्धा नाही, असें छातीला हात लावून सांगणे, डा० भांडारकर, बोरुबुवा याच्या इग्रजी ग्रंथांतील आपणास अनुकूल तेवढीच चार चार वाक्ये घेऊन, त्याच्याच खालची प्रतिकल वाक्ये सोडून देणे, हे कशाचे द्योतक । 'अहं' आले, की त्याच्या पाठोपाठ दुसऱ्याविषयीं तुच्छ बुद्धि असावयाचीच. ओकांनी जनरीतीप्रमाणे श्रीमंतांच्या गुणज्ञतेचा अत्यंत गौरव केला आहे, व कोटिशः धन्यवादही गाइले आहेत हे खरें, तथापि 'जनस्थानावर जे आक्षेप आहेत ते निर्मूळ, निराधार व हिंदस्थानचे भूगोलाचा विशेषसा परिचय नसल्यामुळे केलेले आहेत' इत्यादि वाक्यांवरून त्यांचा समज असा की "श्रीमत हे काय आपल्या राजमंदिरांत बसलेले. जुन्या पद्धतीचे शिक्षण; धड भूगोलाची माहिती नाहीं; इंग्रजी विद्येचा संस्कार नाहीं; शोधकतेचा अभ्यास नाहीं; रसिक मात्र आहेत. ह्याकरितां शेपन्नास इंग्रजी संस्कृत ग्रंथांची गुंडाळी दिली एकदा अंगावर फेंकून की होतील दिप्प " (पुढे चालू.) PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVAJI DADAJI'S "NIRNAYA-SAGARA” PRESS, Bombay.