या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. प्रथमपासूनच मोठी निकोप व सदृढ असून त्यांना तालिमबाजीचा मोठा शोक आहे. त्यांनी कित्येक वेळां नामांकित पैलवानांबरोबर कुस्त्या मारून जय मिळविलेला आहे. ह्यांस तीन चार वर्षांचा मुलगा आहे. (३) श्रीमती सौ० ताईसाहेबांपासून झालेले तिसरे पुत्ररत्न श्री० भवानराव श्रीनिवासराव ऊर्फ बाळासाहेब पंडित पंतप्रतिनिधि हे होत. हेच आजच्या आमच्या लेखाचे नायक होत. ह्यांचा जन्म कार्तिक शुक्ल ९ शके १७९० रोजी झाला. ह्यांचा प्रथमचा विद्याभ्यास औंध मुक्कामींच झाला. त्या वेळी त्यांचे वडील बंधु श्री० तात्यासाहेब हे सातारच्या हायस्कुलांत शिकत होते. त्यांची ह्यांस मोठी अनुकूलता झाली. कारण, तात्यासाहेबांना साताऱ्यास विद्याभ्यासास जाण्याकरितां हट्ट घ्यावा लागला होता, तसा प्रसंग ह्यांस आला नाही. हे बंधूबरोबर जाऊन सहजच साताऱ्याच्या हायस्कुलांत अभ्यास करूं लागले. हे प्रथमपासूनच दिसण्यांत मोठे तेजवी व पाणीदार दिसत. ह्यांची बुद्धि अतिशय तीव्र आहे. ते सन १८८९ साली म्याट्रिक्युलेशन परीक्षा पास झाले, आणि पुढे तसाच अभ्यास चालविण्याकरितां त्यांनी लागलाच पुण्याच्या डेक्कन कॉलेजामध्ये प्रवेश केला; व बी. ए.ची परीक्षा देउन सन १८९५ च्या फेब्रुवारी महिन्यांत त्यांनी युनिव्हर्सिटीकडून 'डिझी' घेतली. नंतर पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे ज्युरिस प्रूडन्सची-व्यवहारास्त्राची व धर्मशास्त्राची-परीक्षा देऊन ते एल्. एल्. बी.च्या अभ्यासास लागले; व तोच अभ्यास सांप्रत चालू आहे. औंध संस्थानचा कारभार रावबहादुर नारायण भिकाजी जोगळेकर हे पहात होते. त्यांनी गतवर्षी अकस्मात् आपल्या कामाचा राजीनामा दिला. ती वेळ फार आणीबाणीची होती. ह्मणजे श्रीमंत यजमानसाहेबांचे थोरले कुटुंब-बाळासाहेब ह्यांच्या सापत्नमातोश्री-नुकतेच निवतेल्यामुळे त्यांच्या मनास स्वस्थता नव्हती. शिवाय, औंधास त्याच संधीस प्लेगमहाराजांनी आपलें ठाणे दिले होते. तेव्हां अशा प्रसंगी कारभार पाहण्याचे काम किती जोखमाचे असेल हे सांगणे नकोच. परंतु तेही काम श्री. बाळासाहेब ह्यांनी आपल्या शिरावर घेऊन उत्तम प्रकारे बजावले. ह्मणजे सांप्रत श्री. बाळासाहेब पंत हे औंधसंस्थानचे कारभारी आहेत. १ आलीकडे साचार महिन्यांत काही फेरफार झाला असल्यास माहिती नाही...