या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. येथपर्यंत श्री० बाळासाहेबांच्या एका अंगाविषयी विचार झाला. ह्मणजे त्यांच्या विद्वत्तेच्या संबंधाने सांगितले. तेवढ्यावरूनही इतर गर्भश्रीमंतांच्या मुलांत आणि ह्यांच्यांत केवढा फरक आहे, हे सहजीं लक्षात येईल. इतर खुशालचेंड्र श्रीमंतांच्या मुलांप्रमाणे सांजसकाळ तहानलाडू भूकलाडू चापावेत, पाटावरून ताटावर, ताटावरून पाटावर बसावें, सुग्रास अन्न खावें, व खुनीच्या गाद्यागिरद्यांवर रात्रंदिवस लोळत पडावें-किंवा नाचतमाशांसारख्या दुर्व्यसनांत मग्न होऊन रहावें-असें जर त्यांनी मनांत आणले असते, तर त्यांस कांहीं कमी होत असे नाही. श्री. बाळासाहेब हे निखालस निर्व्यसनी पुरुष आहेत येवढेच नव्हे, तर त्यांचे खासगी वर्तन अत्यंत निर्मळ, परम पवित्रअतएव सवीसच स्पृहणीय-आहे, हे ज्यांचा त्यांच्यांशी विशेष परिचय आहे त्यांस तर पूर्णपणे माहित आहे. परंतु त्यांचा दृढतर उद्योग, विद्या व कला ह्यांची आवड, व त्यांची नेहेमींची दिनचर्या ह्या गोष्टी मनात आणल्या ह्मणजे कोणी कसाही असो, तो त्यांचा धन्यवाद गाइल्यावाचून रहाणार नाही. ह्या सर्व गोष्टी पुढील विवेचनावरून बऱ्याच अंशी लक्ष्यांत येतील. या त्यांचा दसरा विशेष तारिफ करण्यासारखा गुण चित्रकला हा हाय. चित्र काढण्याचा नाद त्यांस त्यांच्या बालपणापासून आहे. स्लपाटावरचा धडा संपला, की, तिच्यावर चिताऱ्याचे काम सुरू कागदाच्या एका बाजूस बाळासाहेबांची पुस्ती असली, की दुसऱ्या बाजूस त्यांच्या हातचा बऱ्यावाईट चित्राचा नमुना असावयाचा, हे कलम जणों काय लहानपणापासून ठरल्यासारखेच होते. पण ह्या बाजारापणाविषया आमचा एक तर्क आहे. आणि तो बऱ्याच अंशी खरा असावा. तो तर्क हा की, बाळासाहेबांच्या वडिलांनी आपल्यास नित्यदर्शनाकरितां जगत्प्रसिद्ध भिवा सुतार ह्यांजकडून महत्प्रयासाने ध्यायेदाजानुबाह' ह्या पूर्वापारध्यानाप्रमाणे श्रीरामपंचायतनाची मनोरम मूर्ती क्यान्व्हस नांवाच्या जाड रोगणी कापडावर तेलीरंगाने काढवून घेतलेली त्यांच्या संग्रही आहे. आणि ती श्रीमंतांच्या नित्य सान्निध्यास असते. तें ध्यान, ती मूर्ति किती मनमोहक आहे हे श