या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. पड-ज्यास क्यान्व्हस असें ह्मणतात-त्यावर सदोदित आई असलेल्या रंगांनी तसबीर काढण्याची-जी कला, तिचा त्यांनी अभ्यास सुरू केला. व त्यांतच बी. ए. ची परीक्षा देऊन व एल्. एल्. बीचा अभ्यास चालवून सध्या तो इतका ऊर्जितावस्थेस आणलेला आहे की, कोणत्याही | मनुष्यास ते आपणापुढे बसवून, हातांत कलम धरल्यापासून दोन किंवा | तीन तासांच्या आंत त्याचा बस्ट-चेहेरा-रंगवून तयार करतात. आणि त्यात त्याची ओळख इतकी यथातथ्य येते की, एखाद्या लहान मुलाने सुद्धा त्यास सहज ओळखावें ! अशा लीलामात्रेकरून काढलेल्या कैक तसबिरा त्यांच्या बसावयाच्या खोलीत टांगलेल्या दृष्टीस पडतात. कोणीही इष्ट, आप्त, स्नेही त्यांच्या भेटीस जावो, त्यांचे कलम तयारच असते; व तो मनुष्य पानसुपारी घेऊन कुशलप्रश्न वगैरे होईपर्यंत श्री. बाळासाहेबांची ऑईल पेंटिंगची तसबीर तयार होऊन त्याच्या पुढे आलीच. जणों काय फोटोग्राफचे यंत्र, पण त्याला सुद्धा डिव्हलप्राम टिंग होऊन येण्याला एक दोन दिवसांची तरी मुदत लागत. शिवाय, कोठे प्रकाश चांगला पडला नाहीं ह्मणून काळा पडला; काठ पारा कपडा होता ह्मणून सुरकुत्या पडल्या नाहीत; कोठे हातच हालला म णून दोन पंजे उठले; इत्यादि रड असतेच. इतकेंही करून वर रग नाहीं तो नाहींच! आणि डोळ्यांत फुलें पडल्याचा बाणा तर सर्वसाधारण. तेव्हां ह्या हस्तकौशल्याची कडी फोटोग्राफीच्याही वरचा सम जली पाहिजे. हे कौशल्य सामान्य नव्हे, खरोखरच तारिफ करण्या सारखें अपूर्व होय. ह्मणून त्याचे कौतुक मानावे तितके थोडच. आलीकडे काही वर्षांपासून औंधामध्ये कित्येक सद्गृहस्थ जमून प्र. तिवर्षास एक छोटेंसें प्रदर्शन करित असतात. ह्या प्रदर्शनामध्ये औध संस्थानांतील बहुतेक गांवांतील व त्याच्यांत मोडणाऱ्या आठपाडी महालांतील सर्व कारागिरीचे पदार्थ आणलेले असतात. ह्या संस्थेचे मुख्य प्रवर्तक श्री० तात्यासाहेब व बाळासाहेब पंत हेच होत. हे प्रदर्शन पाहण्याचा सुदैवाने एक वेळ आह्मांसही लाभ घडला. ह्यांत आठपाडी महालांतील निघणारे कापड, व औंधास होणारें सोनारकाम ही विशेष प्रेक्षणीय होती. श्रीमंतांच्या जवाहीरखान्यांतील उंची उंची रत्ने, रत्नजडित अलंकार, मौक्तिकहार हेही तेथे पहावयास मिळाले. अशा प्रकारे