या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. तेथे पहाण्यासारख्या चिजा पुष्कळच होत्या. त्या सांगण्याचे हे स्थळ नव्हे-तथापि तेथील एका चिताऱ्याचे काम विशेषच तारीफ करण्यासारखे होते. त्याने एक वृद्ध भटजीबुवांचा पंढरीच्या यात्रेस निघालेला पुतळा तयार केला होता. त्याच्या अंगावरील सुरकुत्या, त्याची खादीची बंडी, माभळभट्टी पागोटें, खांद्यावरील ठिगळं लावलेली पडशी इत्यादि थाट पाहून कोणासही हासू आल्यावांचून रहात नसे. ह्याच कारागिराने श्रीमंतांच्या पदरच्या एका भाटाचा पुतळा केला होता, तो इतका हुबेहुब साधला होता की, तो मनुष्य प्रत्यक्ष पाहतांच आह्मी आश्चर्याने अगदी थक्क झालो. त्याचा रंग, देवीचे वण, घारे डोळे, पागोटें, आंगरखा ही पाहून तो पुतळाच पुढे आला असें आह्मांस भासे! असो.जिESHEमानापानमा ह्या सर्वांतही संतोषाची गोष्ट ही की, तेथील अर्धे अधिक प्रदर्शन श्री. बाळासाहेबांच्या हातच्या ऑईल पेंटिंगच्या भव्य व मनोरम तसबिरींनी सुशोभित झालेले होते. त्यांपैकी अतिसुंदर, मनास केवळ तल्लीन करून टाकणाऱ्या मटल्या ह्मणजे श्रीगजाननाची ऋद्धिसिद्धिसहित मूर्तिः शंकर पार्वती व नंदी; हिच्यांतील कैलासाचा, गंगेच्या प्रवाहाचा सीन फारच प्रेक्षणीय. तसेच श्रीविष्णु इत्यादि अनेक कामें पाहून जगत्प्रसिद्ध राजा रविवर्त्याची स्मृति झाल्यावांचून रहात नसे. परंतु रविवाच्या चित्रांत आमच्या हिकडील पेहराव, ह्मणजे स्त्रियांची लुगडे नेसण्याची ऐट, चोळी घालण्याची तन्हा ह्या अगदीच पेबळट असतात, आणि ती सर्व ह्या तसबिरीत अगदी ठसठशीत, गोंडस, मनोल्हादक दिसतात. येवढेच कायतें अंतर. ह्या प्रदर्शनाच्या समाप्तीच्या दिवशी श्रीमंत थोरले प्रतिनिधीही दरबारास आले होते. तेव्हां श्री० बाळासाहेबांनी सेक्रेटरी ह्या नात्याने सर्व रिपोर्ट वाचला; व कोणकोणत्या कारागिरास काय काय बक्षिसे द्यावयाची, त्याची नांवनिशी वाचून श्रीमंतांस स्वहस्ते बक्षिसे देण्याविषयी विनंती केली. समयास अनुसरून आमीही चार शब्द बोलण्याची दरबाराकडून परवानगी घेऊन प्रदर्शनकमेटीपुढे अशी सूचना आणली की, “प्रदर्शनांतील वस्तूंच्या योग्यायोग्यतेप्रमाणे उत्तेजनार्थ कारागिर लोकांस बक्षिसे देण्याची योजना झाली, ही तर उत्तमच आहे. परंतु ह्या प्रदर्शनांतील अर्धी अ