या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. धिक शोभा श्री. बाळासाहेबांच्या हस्तकौशल्याने आलेली आहे. आणि ते त्यांचे काम किती वर्णनीय आहे, हे सर्व लोक जाणूनच आहेत. तेव्हां ह्या बक्षिसांत श्रीमंतांसारख्या गुणी मनुष्याचा मुळीच अंश नसणे हे नीट दिसत नाही. आतां श्रीमंतांना अशा प्रकारचे बक्षीस घेणे नसेल, किंवा प्रदर्शनकमेटीस त्यांच्या योग्यतेनुसार पारितोषिक देण्याचे सामर्थ्य नसेल, तर निदान शब्दांनी तरी अभिनंदन करणे इष्ट आहे.” ही सूचना प्रदर्शनकमेटीस पसंत पडली. आणि आमच्याजवळ संस्थानचे कारभारी रावबहादुर नारायण भिकाजी जोगळेकर बसले होते, त्यांनी लागलीच सुमारे २५० रुपये किमतीची मुद्रिका आणवून ती श्रीमंत यजमानमहाराज ह्यांच्या हातांत देऊन "ह श्रीमंतांच्या गुणांस साजण्यासारखें नाहीं, तथापि कमेटी हे पारितोषिक सप्रेम देत आहे, ह्याकरितां श्रीमंतांनी त्याचा स्वीकार करावा" अशी प्रदर्शनकमेटीच्या तर्फेनें विनंती केली. तेव्हां श्रीमंत यजमानसाहबांनी बाळासाहेबांच्या वडिलांनी ती मुद्रिका चिरंजीवांस प्रसन्नमुद्रन अर्पण केली. तेव्हां श्रीमंत बाळासाहेबांनी तीर्थरूपांच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्या वेळेस श्रीमंत बाळासाहेबांच्या अप्रतिम गुणांचे स्मरण, त्यांच्या आंगचा विनय, निस्सीम पितृभक्ति ही सवीच्या मनात एकदम उभी राहून सर्वांची अंतःकरणे प्रेमभराने सद्गदित झाली, व त्यांच्या जयघोषाने सर्व सभामंडप दणाणून गेला. असो. ऑइल पेंटिंगच्या कलेला फोटोग्राफी'ची कला अत्यंत साह्यकारा आहे; व तिचा अभ्यास करावयाला पहिल्याइतकी बुद्धि व कालही लागत नाही. कारण, ती सूर्यकिरणांनी, यंत्रांच्या साह्याने, व रसायनिकद्रव्याने आपोआपच बिनचूक काम करणारी आहे. ह्यास्तव बाळासाहेब ह्यांनी लेन्स, क्यामेरा इत्यादि यंत्रे व त्यास लागणाऱ्या औषधी वगैरे ह्यांचाही संग्रह करून त्यांतही ते थोड्याच दिवसांत वाकबगार झाले. त्यांनी आपल्या कुटुंबांतील सर्व मनुष्यांच्या निरनिराळ्या 'पोझिशनच्या' स्वहस्ते तसबिरा काढून त्यांची आल्बम्स भरून ठेवलेली आहेत. शिवाय मोठमोठ्या इमारती, लहान लहान मुले, निरनिराळे सुंदर सृष्टदेखावे ह्यांचेही अनेक निगेटिव्ह त्यांनी आपल्या संग्रहीं ठेवलेले आहेत. ह्यांच्या हाताखाली चार दोन शिष्यही तयार झालेले