या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक १ ला. जानेवारी १८९९. आहेत; व ते नेहेमी चारकोलचें-कोळशाचें काम, केऑनचे काम, .. पाण्याच्या रंगाचे काम करण्यांत गुंतलेलेही दृष्टीस पडतात. ह्यांच्यापैकी एका शिष्याने नांव ध्यानांत राहिले नाही याबद्दल वाईट वाटतेंत्यांच्याच देखरेखीखालीं, वाड्यांतील स्त्रियांच्या पूजेसाठी पिठोरा तयार केलेला आह्मीं पाहिला. खरे मटले तर, पिठोन्याचे चित्र ते कितीसें मनोरम व्हावें ? असे मनाला वाटते. कारण, बाजारांत शिळा छापावर छापलेली चार दोन पैशांस मिळणारी चित्रे कोणत्या त-हेची असतात, ती आपणा सर्वांच्या माहितींतील आहेतच. परंतु हा पिठोरा मणजे एखाद्या मोठ्या प्रदर्शनांतही पाहण्यासारखी चीज होईल, असे त्यांत सौंदर्य साधलेले आहे. ह्याचे डिझाईन करणाराची खरोखर जितकी स्तुति करावी तितकी थोडी होईल. हा पिठोरा ह्मणजे पांचपन्नास उत्कृष्ट देखाव्यांचा समुच्चय होय. ह्यांत कितीएक पूल, नद्या, सरोवरें, पलटणी, राजांच्या स्वाया, व अनेक 'इंडियन क्यारेक्टर्स' दृष्टीस पडतात. ही तसबीर त्या वेळी अपुरी असल्यामुळे आमांस तिचा फोटोग्राफ काढून घ्यावयास मिळाला नाही, याबद्दल जिवास चटपट लागली आहे. असो. श्रीमंत बाळासाहेबांपाशी आणखी एक मनोरम कला मटली ह्मणजे कांचेवर चित्रे काढणे, जीस इंग्रजीमध्ये (Crystolium painting) क्रिस्टोलियम पेंटिंग ह्मणतात ती होय. ही कला फारच मनोल्हादक आहे. ही चित्रे तयार करण्यासाठी पाहिजे त्या आकाराच्या थोडीशी वक्रता दिलेल्या कांचा विकत मिळतात. त्या कांचेवर अंतर्गोलाच्या बाजूस पातळ कागदावरचा-अल्बनाइज् पेपरवरचा–फोटो चिकटवि. तात. नंतर त्यावर एक प्रकारचे तेल चोळून तो कागद पारदर्शक करतात. नंतर तो अशा बेताने घांसून काढावयाचा की, अगदी पातळ-केवळ पूर्वीच्या डांकेच्या कागदासारखा पोपाद्रा मात्र कांचेवर राहील. नंतर त्या फोटोग्राफमध्ये निरनिराळे यथोचित ऑईल पेंटिंगचे रंग भरून ती कांच उत्तम फ्रेममध्ये बसवावयाची. ह्याच तसबिरींना क्रिस्टोलियम पॉटिंग असें ह्मणतात. ही चित्रे रंगीत असल्यामुळे अतिशय १ हे नांव रा. दत्तोबा शिंपी असावें अर्से अंधुकसें स्मरतें. प्रदर्शनांतील पूर्वी वर्णन केलेले उत्तम पुतळे ह्याच गृहस्थांनी तयार केलेले आहेत.