या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. नाजूक दिसतात. द्रौपदीवस्त्रहरण, सत्यवती शंतनु, विश्वामित्र मेनका, इत्यादि चित्रे आह्मीं पाहिली ती फारच चित्तवेधक होती. ज्यांनी दिल्लीची हस्तिदंतावरील लॉकेटसारखी लहान लहान नाजूक रंगीत चित्रं पाहिली असतील, त्यांस ह्या चित्रांची कल्पना चांगली लक्ष्यांत येईल. एकंदरीत औंध संस्थानांत कोणी कसाही बाणेदार चितारी गेला, तर त्याच्या गर्वाचे पाणीच होऊन जाते. शिवाय, गायनवादनांतही त्यांचे आंग चांगल्यापैकी आहे. इतकी विद्या व इतक्या कला संपादन करण्याला त्यांची उद्योगशीलता व दिनचर्या हीच विशेष कारणीभूत आहेत. हे खालच्या विवेचनावरून ध्यानात येईल. श्री० बाळासाहेबांची दिनचर्या, श्रीमंतांनींचशी काय, परंतु प्रत्येक स्थितींतील मनुष्याने कित्ता वळविण्यासारखी असल्यामुळे ती सांगणे अवश्य दिसते. ते नित्यनियमाने प्रातःकाळी चार वाजतां उठतात. नंतर स्नानसंध्यादिक आटोपून साडेपाच वाजतां मूळपीठाच्या पर्वतावरील श्रीयमाईच्या दर्शनास जातात. हा मार्ग सुमारे एक मैल सपाट व एक मैल चढाव इतका आहे. पण तितका मार्ग ते झपाट्याने चढून जातात. ह्यामुळे कित्येक वेळां शिंगाड्याची, चोपदार भालदाराचा में गदी त्रेधा उडून जाते असें ऐकिवांत आहे. तेथे जाऊन दर्शन, ता. र्थप्रसाद घेऊन स्वारी परत फिरते. ती नेमकी सात वाजतां वाड्यात पोंचते. ह्यामुळे त्यांची शरीरप्रकृति सदृढ राहण्यास कारण होते, हे सा. गणे नकोच. नंतर दुग्धप्राशनादि थोडा उपहार होऊन ते कचरात येतात. तेथे आल्यागेल्यांच्या भेटी, पत्रव्यवहार, काही पुस्तकवाचन अमांमध्ये सकाळचा वेळ जातो. दोन प्रहरी अकरा बारांच्या सुमारास भोजन होते. भोजनोत्तर श्रीमंती चालीप्रमाणे मटले ह्मणजे वामकुक्षी होय. पण तिची त्यांस ओळख असेल किंवा नाही ह्याचा वानवाच आहे. बाळासाहेबांचे भोजन आटोपले, की ते आपल्या आवडत्या 'पेंटिंगरूम मध्ये जातात. तेथें आइलपेंटिंगचे सामान तमाम भरलेले असते. त्यांनी बारा वाजतां एकदां कलम हाती घेतले की, त्याला तीन वाजेपर्यंत विराम हा नादींच. मग कितीही कडक उन्हाळा असो की कांही असो. एकीकडे